Loading...

काय म्हणतोय महाराष्ट्राचा EXIT POLL! महाराष्ट्रात कुणाचे येणार सरकार?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आज महाराष्ट्र भर मतदान पर पडले. महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. अनेक दिग्गज मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शरद पवारांनी मुंबईत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात, अजित पवार यांनी बारामतीत तर राज ठाकरे यांनी मुंबईत मतदान केलं. सुरुवातीच्या दोन तासाच मतदारांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र दुपारनंतर मतदानाला काहीसा वेग आला आहे.

‘ABP-CVoter’ चा EXIT POLL

महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी 204 जागांवर महायुती जिंकेल, 69 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 15 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )

Loading...

News18 Lokmat  आणि IPSOS चा EXIT POLL

News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो.

Times Now चा EXIT POLL

Loading...

India Today-Axis चा EXIT POLL

उत्तर महाराष्ट्र विभागातील एकूण 36 जागांपैकी 23 जागांवर महायुती जिंकेल, 12 जागा महाआघाडीला मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )

विदर्भातील एकूण 60 जागांपैकी 50 जागांवर महायुती जिंकेल, 9 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 3 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )

मराठवाडा विभागातील एकूण 47 जागांपैकी 26 जागांवर महायुती जिंकेल, 14 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 6 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )

कोकण विभागातील एकूण 39 जागांपैकी 32 जागांवर महायुती जिंकेल, 5 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना दोन जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )

वरील सर्व आकडेवारी ABP माझा व News18 लोकमत वेबसाईट वरून घेण्यात आलेली आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.