या होळीत कृत्रिम रंगापासून त्वचेला इजा होऊ नये म्हणून करा हे उपाय !

0

होळीचा सन जवळ आला आहे आणि आता सर्वजण जुने भांडण तंटे विसरून एकमेकांना रंग लावतात, आनंद साजरा करतात आणि नव्या उत्साहाने आयुष्याची सुरुवात करतात. ओळी हा सर्वत्धिक आनंदाचा आणि उत्साहाचा पर्व आहे यात काही शंकाच नाही. पारंपारिक होळी ही गुलाल आणि बादलीभर पाण्याने खेळली जायची पण आता गुलाल आणि पाण्याची जागा कृतीम रंगांनी घेतली आहे. जर ते रंग कुणी तुमच्या चेहऱ्यावर चोळले किंवा केसांमध्ये रंग टाकला तर मात्र मग मोठ्या प्रमाणात तुम्हाला इजा देखील होऊ शकतात.

ते तर म्हणून देतील कि “बुरा ना मानो, होली है” पण मग त्रास तर तुम्हालाच सहन करावा लागेल न म्हणून तुम्ही एक कामा करायचं; थोडीशी काळजी घ्यायची, आधीच टीकाकरण करून घ्यायचं आणि ते कसं करायचं? ते पुढे वाचा. होळीचे रंग तुमच्या चेहऱ्यावर किंवा केसांत होळीनंतर देखील बरेच दिवस राहू शकतात.

असं होऊन नये म्हणून त्यासाठी देखील उपाययोजना आहेत. धुलीवंदनाच्या आधल्या दिवशी, संपूर्ण शरीरावर तेल लावा आणि त्वचेची चांगली मसाज करून घ्या. याने तुमची त्वचा हायड्रेट होते आणि दुसऱ्या दिवशी जर कुणी तुम्हाला रंग लावता तर त्वचा तो रंग जास्त सोकून घेत नाही. तेल तुमच्या त्वचेची ढाल म्हणून काम करते म्हणून तुम्ही होळीच्या आधल्या दिवशी हा प्रयत्न करू शकता.

तुमची नेमक्या धुलीवंदनाच्या दिवशी देखील थोडी काळजी घेऊ शकता. होळी खेळायला जायच्या १ तासाअगोदर अंगावर बॉडीलोशन लावून घ्या. आपल्या डोळ्यांच्या आणि कानाच्या सभोवताल देखील थोडं बॉडीओईल लावूनच घ्या. एकदम नखांपर्यंत लावत चला आणि थोडं लंब्या बाह्यांचे शर्ट किंवा TOP घाला म्हणजे त्या कृत्रिम रंगांच्या थेट संपर्कात येण्यापासून वाचून जाल आणि मग अंघोळीला २ तास घालवावे लागणार नाही.

होळी खेळून झाल्यानंतर थोडं नाजूक हातांनीच आपली त्वचा आणि अआप्ले शरीर, जिथं जिथं तुम्हाला रंग लागला आहे ते फेसवाश किंवा साबणाने घुवून घ्या. थोडं नाजूक हातांनीच करा बरं का… केसांतील रंग काढण्यासाठी श्याम्पूचा वापर करा. श्याम्पू केल्यानंतर कंडीशनर लावा आणि २ ४ मिनिटं तसंच राहू द्या व नंतर थंड्या पाण्याने धुवून घ्या. मग अंघोळ झाल्यावर आपल्या पूर्ण शरीराला बॉडी मोईस्चराईजर लावायला विसरू नका; त्यानेतुमची त्वचा उन्हाने किंवा लागलेल्या रंगाने शुष्क पडणार नाही.

जर तुमची त्वचेला काही खास गोष्टींच्या संपर्कात आल्यावर त्रास जाणवत असेल तर माझं म्हणणं हेच राहील कि थोडं सांभाळून होळी खेळ. ओर्गेनिक/जैविक रंग असतील तर त्यांची उधळण करा पण आपल्या त्वचेला रंग किंवा मोईस्चराईजर लावूनच खेळा. आपल्या त्वचेला आणि केसांना सुरक्षित ठेऊन जर तुम्ही होळी खेळत असाल तर तीच तुमची सर्वात सुरक्षित होळी आहे आणि कधीही नैसर्गिकरंगाचा वापर करणे चांगले.

आता एवढं करूनही तुम्हाला कुणी कृत्रिम रंग लावला, तुम्ही अंघोळ केली आणि तो निघाला नाही आणि त्वचा देखील लाल झाली तर मग त्यासाठी सुद्धा तुम्ही काही उपाय करू शकता. थोडंसं उच्च श्रेणीतील मोईस्चराईजर वापर आणि थोडजास्तच त्रास असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या देखील घेऊन शकता.

वर्षभर पाणी वाचवा, रोज एक बादली वाचवत असाल तर दोन बदल्या वाचवा आणि या वर्ष आनंदाची मस्त आनंदाची, नैसर्गिक रंगांची आणि भरपूर पाण्याची होळी खेळा कारण तुम्ही होळी खेळणार नाही तर मग तुमच्या आईला/बायकोला फरशी फुसायला नवीन फडकं मिळणार नाही. स्टार मराठी कार्यकार्त्यांकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!