पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार बेअर गिल्स सोबत या थरारक शोमध्ये !..

0

साहसी गोष्टी करण्यासाठी व्यक्ती सुद्धा धाडसी असावी लागती. जगात ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या गोष्टी करायला नेहमी माणूस उत्सुक असतो. त्याला त्या गोष्टी कराव्या वाटत असतात. सध्या भारताचे पंतप्रधान मा. नरेंद मोदी यांना सुद्धा धाडसी आणि साहसी होण्याचा मोह आवरला नाहीये. ते डिस्कवरी या जगप्रसिद्ध असलेल्या चॅनेल च्या शो मध्ये दिसणार आहेत.

Man vs wild या शो मध्ये नरेंद्र मोदी हे दिसणार आहेत. हा सगळा शो भारतल्या उत्तरांचल मधील एका नॅशनल पार्क मध्ये चित्रित केला गेला आहे. यामध्ये मोदींनी अनेक प्राण्यासोबत आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत. बेयर ग्रील्स हा खूप प्रसिद्ध शो होस्टर आहे त्याच्या सोबत मोदी दिसणार आहेत. या विषयी बेयर गिल्स ने सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल केलं आहे.

त्याने अपलोड केलेला विडिओ सध्या ट्रेंडिंग वर आहे. देशातील लोकांना देशाचा पंतप्रधान एखाद्या शो मध्ये दिसणार हे कळताचं खूप शो पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या सगळ्या गोष्टी बाबत गिल्स काय म्हणाले ते खालील वाचा..

● जवळपास 180 देशातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचा कधीही न पाहिलेला पैलू पाहतील
● पर्यावरणातील बदल आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाच्या निमित्ताने ते सर्वांपर्यंत पोहोचतील
● या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ देणे हे आमच्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे
● पंतप्रधान मोदींसोबत वेळ घालवून भारताचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्याबाबत मलाही जाणून घेता येणार आहे ..अस गिल्स यांनी भावना व्यक्त केली आहे.

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी : मोदी यांच मत ! ● अनेक वर्षे आपण डोंगरदऱ्या, पर्वते, जंगलांत म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात राहिलो असून ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाद्वारे भारताचे नैसर्गिक वैभव जगाला दाखवण्याची संधी मिळाली आहे.
● पुन्हा एकदा जंगलात बेअर ग्रिल सारख्या अमर्याद ऊर्जा असलेल्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे आपल्याला खूप आवडले..कारण धाडसी आणि साहसी गोष्टी करणं जमलं ही पाहिजे..

येत्या 12 ऑगस्टला रात्री 9 वाजता हा खास भाग 12 डिस्कव्हरी वाहिन्यांवर प्रेक्षकांना पाहता येणार, हा कार्यक्रम इंग्रजी, बंगाली, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!