तुम्हाला माहित आहे का ‘जयराम कुलकर्णी’ यांनी या कारणासाठी दिला होता नोकरीचा राजीनामा !

सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. म्हणून ग्रामीण भागात होणार्या नाटकांत त्यांनी अभिनय करत पहिला प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा प्रयोग इयत्ता सातवीत असताना शाळेत केला. आणि मावशीच्या भुमीकेसाठी त्यांना लोक ओळखू लागले.  देहबोली गावरान अर्थात ग्रामीण भागातील असल्यामुळे मोरूची मावशी या नाटकातील अभिनया मुळे त्यांना पु.ल. देशपांडे यांसारख्या नाटककाराच्या नाटकात काम मिळाल. ती होतं ‘ अमलदार’ नाटकातील हणम्याची भुमीका. हणम्या हे पात्र इतकं प्रसिद्ध झालं की त्यामुळे त्यांना ग्रामीण भाषेतील पहिला अभिनेता अशी ओळख बनत गेली.

अनेक मराठी नाटकांत काम करत असतानाच त्यांनी आकाशवाणीत नोकरी सुरू केली. त्यामुळे व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या अनेक साहित्यिकांशी त्यांची मैत्री जमली. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या पुस्तकांचे कार्यक्रमाच्या माध्यमातून वाचन केले. देहबोली आणि ग्रामीण भाषेमुळे त्यांना अनंतराव माने यांनी चित्रपटात भुमीका दिली. नोकरी संभाळत त्यांना चित्रपटात काम करणे फार अवघड जात असे म्हणून त्यांनी प्रथम त्यांनी आवड जोपासली आणि नोकरीला राजीनामा दिला. भक्कम अभिनयाच्या जोरावर जयराम कुलकर्णी यांना सरपंच, पाटील यांसारख्या भुमीका मिळाल्या आणि त्या अभिनयामुळे अजरामर ही केल्या.

मराठी चित्रपट सृष्टीतल्या या दिग्गज कलाकाराचे निधन, नाव जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल…. मराठी रंगभूमी असो वा मराठी चित्रपट सृष्टी यासाठी मोलाचे योगदान देणारा अभिनेता म्हणजेच जयराम कुलकर्णी हे होय. अनेक खलनायकाची भुमीका साकारून त्यानी अभिनयाचे दर्शन घडविले. एका पेक्षा एक सुपर हिट सिनेमात काम करून त्यांनी मराठी चित्रपटाचे नाव गौरविले.

चल रे लक्ष्या मुंबईला, खट्याळ सासू नाटाळ सुन, अशी ही बनवा बनवी, रंगत संगत, खर कधी बोलू नये, माझा पती करोडपती, थरथराट अश्या अनेक सिनेमात जयराम कुलकर्णी यांनी लक्षवेधी भुमीका साकारल्या. तसेच काही दिवसा पूर्वी ‘खेळ आयुष्याचा’ हा सिनेमा शेवटचा ठरला आणि वृध्दाप काळाने वयाच्या 88व्या वर्षी त्यांचे निधन झाले

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अश्या अनेक नव्वदीच्या दशकातल्या सुपरस्टारांसोबत त्यांनी काम केले आहे आज चित्रपट सृष्टीत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सुन मृणाल कुलकर्णी अभिनेत्री म्हणून नाव भुषवत आहेत. जयराम कुलकर्णी यांच्या अभिनयाच्या योगदानाला मानाचा मुजरा