पल्लवी बद्दल काय लिहावं काहीच सुचत नाही – डॉ. अमोल कोल्हे !

0

पल्लवी, खूप कमी वेळा होतं असं पण काय लिहू सुचत नाहीये…एक रिक्तपणा जाणवतोय.. ऐतिहासिक स्त्री व्यक्तिरेखा साकारताना आवश्यक असणारी अदब, शालीनता, तेज, मार्दव आणि हे सगळं दाखवताना लागणारी सहजता, आवाजातील जरब आणि तरीही असावी लागणारी फिरत, भूमिकेची समज, इतिहासाचं भान आणि तरीही उलगडून दाखवायचं माणूसपण!

हे सगळं माझ्या मते मृणालताई नंतर तुलाच बेमालूमपणे जमलं… तुझी मेहनत, प्रामाणिकपणा, अनुभव पणाला लावण्याची वृत्ती, व्यक्तिरेखा भिनवून घेणं,वैयक्तिक आयुष्यात “आई, पत्नी, सून” या जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावताना वेचलेले काही क्षण भूमिकेत बेमालूम पेरणं… सगळं अप्रतिम! आता इथून पुढे लिहिताना अनेकदा तू अजून मालिकेत असायला हवी होतीस असं वाटत राहणार, सीन करताना इथे पल्लवी असती तर असं वाक्य कित्येकदा सेटवर उमटणार..

यात तुझं यश आहे आणि ते निखळ “तुझं” यश आहे! पटकथा बांधताना तू आहेस याचा कायम आधार वाटला, निर्माता म्हणून जगदंब क्रिएशन्सला तू टीमची सदस्य आहेस याचा अभिमान आणि कलाकार म्हणून तुझ्याबरोबर सीन करणं याचा निरतिशय आनंद! हा निरोप नाहीच, या आहेत एका सक्षम अभिनेत्रीला, एका सच्च्या व्यक्तीला पुढच्या भरारीसाठी शुभेच्छा!!!

View this post on Instagram

पल्लवी, खूप कमी वेळा होतं असं पण काय लिहू सुचत नाहीये…एक रिक्तपणा जाणवतोय.. ऐतिहासिक स्त्री व्यक्तिरेखा साकारताना आवश्यक असणारी अदब, शालीनता, तेज, मार्दव आणि हे सगळं दाखवताना लागणारी सहजता, आवाजातील जरब आणि तरीही असावी लागणारी फिरत, भूमिकेची समज, इतिहासाचं भान आणि तरीही उलगडून दाखवायचं माणूसपण! हे सगळं माझ्या मते मृणालताई नंतर तुलाच बेमालूमपणे जमलं… तुझी मेहनत, प्रामाणिकपणा, अनुभव पणाला लावण्याची वृत्ती, व्यक्तिरेखा भिनवून घेणं,वैयक्तिक आयुष्यात "आई, पत्नी, सून" या जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावताना वेचलेले काही क्षण भूमिकेत बेमालूम पेरणं… सगळं अप्रतिम! आता इथून पुढे लिहिताना अनेकदा तू अजून मालिकेत असायला हवी होतीस असं वाटत राहणार, सीन करताना इथे पल्लवी असती तर असं वाक्य कित्येकदा सेटवर उमटणार..यात तुझं यश आहे आणि ते निखळ "तुझं" यश आहे! पटकथा बांधताना तू आहेस याचा कायम आधार वाटला, निर्माता म्हणून जगदंब क्रिएशन्सला तू टीमची सदस्य आहेस याचा अभिमान आणि कलाकार म्हणून तुझ्याबरोबर सीन करणं याचा निरतिशय आनंद! हा निरोप नाहीच, या आहेत एका सक्षम अभिनेत्रीला, एका सच्च्या व्यक्तीला पुढच्या भरारीसाठी शुभेच्छा!!! #zeemarathi #swarajuarakshaksambhaji @pallavi.vaidya.180 @kartik_kendhe @vivek.deshpande.906638 @jagdamb_creations_official @snehlatavasaikar_official @latika_sawant @prajakta_gaikwad_official @sojalsawant @mrunmayeekuber @shantanusmoghe @nirmal.jani56 @sameerkavathekar @sachingadre

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe) on

 

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल :  starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!