तुमची आवडती मालिका ‘वहिनी साहेब’ आता पहा झी युवावर..

झी समूह आणि प्रेक्षक यांचे नाते हे अटूट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात झी मराठी आणि झी युवा या वाहिन्या न पाहणारे प्रेक्षक हे अपवादच म्हणावे लागतील. अर्थात या दोन्ही वाहिन्या नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची योग्य काळजी घेत नेहमीच उत्तमोत्तम मालिका घेऊन येत असतात. आजवर झी मराठीवर असंख्य मालिका आल्या त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यातील सर्वाधिक प्रेक्षकांची आवडती मालिका ‘वहिनी साहेब’ आता लवकरच झी युवा या वाहिनीवर प्रेक्षकांना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.

शरद पोंक्षे, सुचित्रा बांदेकर आणि भार्गवी चिरमुले सारख्या अतिशय तगड्या कलाकरांची जमलेली भट्टी पाहण्याची सुवर्णसंधी झी युवामुळे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मिळणार आहे .

घराला घरपण देणारी असते ती त्या घरातील स्त्री, आई, मुलगी, बहिण, सुन अशा वेगवेगळ्या भूमिकेतून ती घर सजवत असते. घरातील आई ही एके काळची सुन असते. अनेक वेळा केवळ घराची घडी व्यवस्थित बसण्यासाठी समोर येणाऱ्या संकटांशी, नियतीच्या लहरींशी टकरा देऊन घरी येणारी ही सून ‘वहिनीसाहेब’ बनून डोंगराएवढी मोठी होत जाते. मात्र तिची परिस्थिति खरच बिकट असते जेव्हा तिची ओळख, तिचे हक्क तिचा नवराच डावलतो. या एका ओळीत ज्यांनी वहिनी साहेब मालिका आवडीने पाहिली असेल त्यांची भावनुक गुंतवणूक होईलच मात्र ज्यांनी पाहिली नसेल त्यांना या मालिकेची व्याप्ती आणि मुख्य म्हणजे विषय समजला असेल. वहिनी साहेब ही मालिका म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील सुनेची कथा आहे. या मालिकेच्या पुनः प्रक्षेपणाद्वारे झी युवा ही वाहिनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील वहिनी साहेब यांना मानाचा मुजरा करत आहे. तर पहायला विसरु नका ‘वहिनी साहेब’ ही उत्कृष्ट कलाकृती ‘झी क्लासिक’ या खास सेगमेंटमध्ये २७ जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ४ ते ६ दोन तास सलग केवळ आपली आवडती वाहिनी झी युवावर!