Loading...

हे आहेत भारतातील रहस्यमय 5 मंदिर त्या बद्दल जाणून तुम्ही व्हाल चकित !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

भारत देश आपल्या भौगोलिक परिस्थिती आणि सौंदर्यामुळे कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत आणि भारतातील सर्वात जास्त आकर्षित करणारी ठिकाणे कोणती असतील तर ती आहेत आपली मंदिरे. काही प्रसिद्ध आहेत त्यांच्यात लपलेल्या खजाण्यामुळे, काही प्रसिद्ध आहे त्यांच्या बारीक-बारीक नक्षीकामामुळे आणि काही प्रसिद्ध आहे त्यांच्या इतिहासामुळे. काही मंदिरे पाहताबरोबर आपल्याला वाटते “याचा निर्माण तरी कसा केला असेल त्या काळी आणि तेही इतक्या तंत्रज्ञानाच्या अभावी.

आज आपण काही मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत पण त्यांचा संबंध गाडलेल्या धनाशी नाहीये आणि खगोलशास्त्राशीही नाही पण या मंदिरांबद्दल तुम्हाला नक्कीच नवल वाटेल.

Loading...

१. करनी माता मंदिर : मागच्या वर्षी पद्मावत चित्रपट आल्यानंतर भारतभऱ्यात आपले नाव चमकविणारी करनी सेना तुम्हाला माहितीच असेल. त्यांनी याच देवीच्या नावावरून नाव ठेवलं आहे. हे मंदिर त्याच्या दडलेल्या अफाट खजाण्यामुळे आणि त्याच्या गुप्त मार्गांमुळेनव्हे तर मंदिरात असणाऱ्या उंदरांमुळे प्रसिद्ध आहे.

बिकानेर, राजस्थान मध्ये असलेल्या या मंदिरात जवळपास २०००० उंदीर आहेत. मंदिरातजिकडे तिकडे तुम्हाला काळे उंदीर दिसतील. लाखोंच्या संखेत श्रद्धाळू या मंदिरात साकडं घालायला येतात. या मंदिरात उंदीरांना काबा म्हटलं जाते आणि मंदिराला “उंदीरांचे मंदिर” असेही म्हटल्या जाते.

इथे उंदीरांना जेवण घातल्या जाते आणि त्यांचे संरक्षणही केल्या जाते. इथे इतके उंदीर आहेत कि तुम्हाला पाय घासत-घासत चालावं लागेल. येथील श्रद्धाळू उंदिरावर पाय पडणे अशुभ मानतात आणि पांढरा उंदीर दिसणे हे सर्वात शुभ मानले जाते आणि येथील लोकं तर असेही म्हणतात कि एक जरी उंदीर तुमच्या पायावरून गेला तर तुमच्यावर करनी मातेची कृपा झालीच म्हणून समजा.

२. कन्याकुमारी देवी मंदिर : भारताचे सर्वात शेवटचे टोक म्हणजेच कन्याकुमारी. इथे समुद्रतटावरच कन्याकुमारी देवीचे मंदिर आहे जिथे माता पार्वतीच्या कन्या स्वरुपाची पूजा केली जाते. हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे पुरुषांना कमरेच्या वरील कपडे काढूनच प्रवेश लागतो.

पुरातन कथेनुसार या ठिकाणी देवीचा विवाह संपन्न न झाल्याने तेथील गहू-तांदूळ दगडात रुपांतरीत झाले आणि आजही तुम्हाला तेथील दगड त्या रुपात पाहायला मिळतात. जर तुम्ही कन्याकुमारीला गेलेले असाल तर तेथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यालायक आहे तुम्हाला माहिती आहे. सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला पर्यटक आपल्या घराच्या छपरावर आनंद घेताना तुम्हाला दिसून येतील.

३. मेरी धार्मिक स्थळ (कैलाश पर्वत) : हिमालय पर्वताच्या सर्वोच्च स्थानी मानसरोवर जवळ आहे ही पवित्र जागा. पौराणिक मान्यतेनुसार इथेच भगवान शंकर राहतात. जवळच मेरू पर्वतही आहे. या संपूर्ण क्षेत्राला शिवलोक किंवा देवलोकही म्हटल्या जाते. रहस्य आणि चमत्काराने परिपूर्ण या जागेची महिमा वेद पुराणात भरलेली आहे.

२२००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला हा पर्वत उत्तर हिमालयाच्या तिब्बत क्षेत्रात आहे. हा पर्वत हिंदू, बौद्ध, जैन आणि तिब्बती धर्माचे आराध्य स्थान आहे सोबतच ब्रम्हपुत्रा, कर्नाली, सिंधू आणि सतलज नदीचा उगमही या पर्वतातून झाला आहे.

Loading...

४. शनी शिंगणापूर : भारतात सूर्यपुत्र शनिदेवाचे अनेक मंदिर आहेत पण शनी शिंगणापूर हे सर्वात आगळे वेगळे आहे, अहमनगर, महाराष्ट्रमध्ये स्थित या मंदिराची विशेषतः हीच आहे कि येथील शनी देवाची प्रतिमा ही खुल्या आकाशात स्थित आहे आणि सभोवताल आहे फक्त एक संगमरमरचा ओटा.

या गावाचीही एक खास गोष्ट म्हणजे गावात बहुतांश घरात दारे-खिडक्या-तिजोऱ्या नाहीत कारण या गावात चोऱ्याच होत नाहीत. असं म्हणतात कि जो पण इथे चोरी करतो त्याला शनी महाराज स्वतः शिक्षा करतात.

५. सोमनाथ मंदिर : १२ जोतिर्लिंगात पहिले असणारे सोमनाथाचे हे मंदिर आहे. प्राचीन काळात या मंदिरातील शिवलिंग हे हवेत झुलताना दिसायचे पण आक्रमणकर्त्यांनी ते तोडून टाकले. म्हणतात कि २४ शिवलिंगाच्या मधोमध याची स्थापना केली होती.

काही लोकं तर असेही म्हणतात कि याचा निर्माण स्वतः चंद्रदेवाने केला आहे. ऋग्वेदातही याचा उल्लेख केल्या गेला आहे. या मंदिराला आतापर्यंत १७ वेळा नष्ट केल्या गेले आहे. यदुवान्शांसाठी हे स्थान खूपच महत्त्वाचे आहे. इथेच भगवान श्रीकृष्णाने आपला देहत्याग केला होता.

कसा वाटला तुम्हाला हा लेख आणि यातील कोणती माहिती तुम्हाला सर्वात जास्त नवलाची वाटली हेही सांगा.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.