ही आहे जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटर, फोटो पाहिल्यांनंतर तुम्हीही पडालं तिच्या प्रेमात!

नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लडने भारतावर विजय मिळविला. पण महिला क्रिकेटलाही विश्वचषकादरम्यान झालेल्या रंगतदार सामन्यांमुळे वलय निर्माण झाले आहे. अनेक वर्षे माध्यम आणि समाजाकडून दुर्लक्षित असलेल्या भारतीय महिला क्रिकेटर्सही प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

या विश्वचषकामध्ये वेगवेगळ्या संघाच्या खेळाडूंची सांघिक आणि वैयक्तिक कामगिरीही पाहायला मिळाली. त्यातही काही खेळाडू आपल्या बहारदार सौंदऱ्यामुळेही चर्चेत राहिल्या. पण यात एक महिला ऑलराऊंडर क्रिकेटर सर्वांच्याच नजरेत बसली. कॅमेराच्या नजरा नेहमीच या खेळाडूवर राहिल्या.

ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू एलिस पॅरी एक ऑलराऊंडर असून विशेष म्हणजे ती केवळ मैदानातच नाही तर अनेक बाबतीत ऑलराऊंडर आहे. तिचे नाव जगातील सौंदर्यवती महिला खेळाडूंमध्ये अग्रस्थानी घेण्यात येते.

तिचा फिटनेस तर तिच्या खेळातून आपण पाहिलाच असेल. क्रिकेटच्याआधी पॅरीने साधारण १६ वर्षाची असताना नॅशनल फुटबॉलमध्ये आपले स्थान बनविले होते. ही ऑस्ट्रेलियाची अशी एकमेव खेळाडू आहे जिने दोन खेळाच्या विश्वचषकामध्ये सहभाग घेतला.

एलिस पॅरीचे नाव नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात खुपवेळा चर्चेत राहिले. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सेमीफायनलमध्ये एलिसने ३८ रन्सची खेळी करत मितालीचा रेकॉर्ड तोडला होता.