सातवी शिकलेल्या आईच्या जिद्दीने मुलीला बनवलं उप जिल्हाधिकारी !

0

दरवर्षी परीक्षा होते. दरवर्षी विद्यार्थी फॉर्म भरतात आणि दरवर्षी आपल्याला एक अशी बातमी ऐकायला जी आपल्याला प्रेरणा देते, स्फूर्ती देते. यावर्षी सुद्धा पूजाने उपजिल्हाधिकारी होऊन आता एक नवीन उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे. नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेचा निकाल लागला आणि लागलेल्या निकालात पुण्यातील पूजा गायकवाड हिची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे आणि तिच्या कष्टाच्या कौतुका सोबत तिची आई अरुणा गायकवाड यांचे विशेष कौतुक होत आहे.

बाप शेती करत असला तर त्याला वाटत नाही कि त्याच्या मुलाने त्याच्यासारखं शेतीत राब-राब राबावं; आई दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी करत असेल तर तिला वाटते आपल्या मुलीने शिकावं आणि काहीतरी मोठं काम करावं जेणेकरून आयुष्यात तिला तसे दिवस पाहावे लागणार नाही आणि गायकवाडांची पूजा त्या प्रत्येक विचारला पूर्ण करणारी ठरली आहे.

अरुणाताई गायकवाड यांचे शिक्षण म्हणजे सातवीपर्यंत पण त्यांनी शिक्षणाचे महत्त्वं ओळखलं आणि आपल्या मुलीलाही पटवून दिलं. गायकवाड दाम्पत्याला तीन मुली आहे. मोठी मुलगी सोनल हिला महसूल खात्यात नोकरी आहे तर दोन नंबरच्या पूजाने राज्यशास्त्र या विषयात पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे. तिसरी मुलगी सध्या शिक्षण घेत आहेच. पूजाच्या या यशाने गायकवाड कुटुंबाचा आनंद गगनात सामावत नाहीये.

पूजाचे वडील तानाजी गायकवाड हे रेल्वे कॅन्टीनच्या नोकरीत होते पण ते आता सेवा निवृत्त झाले आहेत. तिची आई अरुणा गायकवाड ही गुर्हिनी आहे. घरची परिस्थिती खूप श्रीमंत नसली तरी तिच्या आई वडिलांनी इंग्रजीचे महत्व ओळखून तीनही मुलींना इंग्रजी शाळेत घातले. मुली काय अभ्यास करत आहेत आणी काय नाही याकडेही त्यांचे लक्ष लागले होते. विशेषतः तीनही मुली आहेत असा उल्लेखही त्यांनी कधीही केला नाही.

जे आपल्या नशिबात आलं ते आपण भोगलंय, अनुभवलंय पण तेच सगळं आपल्या मुलांनी अनुभवू नये असं प्रत्येक पालकाला वाटते. त्यांचा भविष्यकाळ देखील उज्ज्वल व्हावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. संसाराचा गाडा रेटता-रेटता देखील आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊनच जाते. पण अपवाद तर सगळीकडेच असतात.

मुलांचे भविष्य घडवण्यासाठी दिवस रात्र एक करतात नव्हे त्यांचे यश हे आयुष्याचे ध्येय बनवतात. आणि याचाच परिणाम दिसतो जेव्हा त्यांच्या कष्टाचे निकाल येतात!  याबाबत अरुणा म्हणतात, ‘तिला मी कधीही काही काम सांगितलं नाही. ती अभ्यास करायची आणि मी तिला बाहेरून शक्य तेवढी मदत करत होते. अवघ्या पाच हजार रुपयांची पुस्तकं घेऊन ती नायब तहसीलदार झाली.

पण यावेळी अभ्यास करताना तिला वेळेत जेवण देणं, घरात अभ्यासाचं वातावरण ठेवणं आम्ही केलं.आम्ही मुलींच्या लग्नासाठी पैसे नाही जमवू शकलो पण मुलींचे शिक्षण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केल्याचा त्या आवर्जून सांगतात. पूजा सांगते, ‘एकवेळ बाहेरचे लोक म्हणायचे पण माझ्या आई वडिलांनी मुलगा-मुलगी भेद तर लांबचं पण आम्ही ‘मुली’ असल्याचा उल्लेखही केला नाही.

 त्यांनी आमच्या म्हणण्याला, निवडीला कायम महत्व दिले. आम्हाला स्वातंत्र्य दिले. मी पहिल्या प्रयत्नात नायब तहलसीलदार झाल्यावरही मला उपजिल्हाधिकारी होण्याची आस होती. त्यांनी आणि माझ्या ताईने त्याला भक्कम पाठिंबा दिला. आज जे काही यश मिळवले यात त्यांचा वाटा सर्वाधिक आहे. आई वडिलांनी दिलेले स्वतंत्र्य मला निर्णय घेताना कायम उपयोगी पडणार आहे.

 त्यांच्या संस्कारांच्या शिदोरीवर एक उत्तम, संवेदनशील प्रशासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न येत्या दिवसात प्रत्यक्षात अवतरणार आहे.
पूजा गायकवाडचे यश कौतुकास्पद आहे आणि तेवढेच कौतुकास्पद आहे तिचे आईवडील. स्टार मराठी कार्याक्रत्यांकडून तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आई-वडिलांना आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच काम करत रहा. अभिनंदन!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!