तुला पाहते रे मधील मायरा घेऊन येत आहे एक नवी वेबसिरीज

0

मध्यम वर्गीय कुटुंबातली, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली “रेवा” तिच्या शेफ असलेला मित्राबरोबर “सत्या” बरोबर “लिव्ह  इन रिलेशनशिप” मधे राहतेय. जसं जसं ते एकत्र राहायला लागतात, एकमेकांच्यासाठी कॉम्प्रोमाइज करणं सुरु होतं. एकमेकांची जितकी सवय होत जाते तितकाच एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग येणं हि चालू होतं आणि एक दिवस  विथ मुचुअल अंडरस्टॅण्डिंग ते ब्रेकअप करायचा ठरवतात. दोघांच्याही आयुषात नवीन पार्टनर्स येतात. पण रेवाचा आणि सत्याचा एकमेकांबरोबर असलेला कंम्फर्ट तसूभरही कमी होत नाही. पुढे काय होतं ? हे जाणून घेणासाठी पाहावी लागेल “रिव्हर्ब कट्टा” या मराठी युट्युब चॅनेल वर सध्या सुरु असलेली वेबिसरीज “मुविंग आउट सिझन २”.

अभिज्ञा भावे या गुणी अभिनेत्रीने यात “रेवाची ” भूिमका केली असून “सत्याच्या” भूिमकेतिल निखिल राजेशिर्केने तिला  उत्तम साथ दिली आहे. या मालिकेचे आणखी एक विशेष म्हणजे “गिरीजा ओक गोडबोले” आणि “ऋषी सक्सेना” या आघाडीचा कलाकारांनी वेब विश्वात पदार्पण केलेआहे.

“रिव्हर्ब कट्टा” या मराठी युट्युब चॅनेलवर आपण दर आठवड्याला याचा एक भाग बघू शकाल. हि मालिका करण्यामागचं एक महत्वाचं कारण सांगताना रिव्हर्ब प्रोडक्शनचे अभिजित कोल्हटकर म्हणाले कि  युट्युब बघत लहानाची मोठी होणारी जनरेशन ज्या फॉरमॅट मध्ये इन्फॉरमेशन सॊकिंग करते,  त्याच फॉरमॅट मध्ये त्यांच्यापर्यंत वेबसिरीज आणि  शॉर्टफिल्मच्या स्वरूपात उतम आणि दर्जेदार कलाकृती  पोहचविण्याचा आमचा नेहेमीच प्रयत्न राहील.

रिव्हर्ब कट्टावर गेली दोन वर्षे सातत्याने अनेक लोकप्रिय वेबसिरीज आणि शॉर्टफिल्म आपण बघत आहोत. यामध्ये मुविंग आउट सिझन १ , ट्विस्ट इट , नाईट आउट, अंतर्नाद कविता, घरकुल यासारख्या  विविध विषयांतील वेबसेरीजचा समावेश आहे. “रिव्हर्ब कट्टा” हा एकमेव असा युट्युब चॅनेल आहे ज्यावर आपल्याला नेहेमीच उत्तम आशयाच्या  निखळ मनोरंजन करणाऱ्या वेबसिरीज आणि शॉर्टफिल्म बघायला मिळतील. अधिक माहितीसाठी www.reverbproductions.in या वेबसाईटला अवश्य  भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!