असं एक घर जिथे लोक मरण्याची वाट बघण्यासाठी येतात .

0

‘मोक्ष’ ह्या एका स्थितीला पोहोचण्याकरिता हिंदू धर्माचे लोक आयुष्यभर प्रयत्नशील राहतात. हिंदू धर्माच्या ग्रंथात सांगितल्या प्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. दान धर्म, देव धर्म, चार धाम यात्रा न जाणो अजून कित्येक खडतर प्रवासही करतात. मोक्ष म्हणजे ८० लक्ष योनीतुन प्रवास करत पुन्हा मनुष्य जन्माला न येणे..!! खरे तर जन्माला आल्यावर हा कितवा जन्म आहे हे कोणीच सांगू शकत नाही.

मात्र हिंदूंची धारणा आणि श्रद्धा त्यांना मोक्षाचे दरवाजे वाजवण्यासाठी अथक परिश्रम करावयास भाग पाडते. तरीही त्यांना मृत्यूनंतर मोक्ष मिळतो किंवा नाही असे कोणीही ठाम पणे सांगूच शकत नाही. मात्र भारतातील उत्तरप्रदेशातील वाराणसी इथे एक घर आहे जिथे आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसात गेल्यास मोक्ष नक्की मिळेल अशी शाश्वती दिली जाते. काशी लाभ मुक्ती भवन असे त्याचे नाव..!!

१९०८ पासून हे मुक्ती भवन अस्तित्वात आहे. आज जवळ जवळ ११० वर्षे तिथे कित्येक जण जाऊन मृत्यू पावले आहेत. त्यांच्या कडे अशा माणसांची नोंद देखील ठेवली जाते. जो जो तिथे जाऊन मुक्त झाला आहे त्याची तपशीलवार नोंद तेथील वह्यांमध्ये केली जाते. इंग्रजांच्या काळात बनलेल्या ह्या भवनात भारताच्या कोनाकोपऱ्यातून माणसे आपल्या शेवटच्या दिवसात येतात आणि मोक्ष मिळवण्याची अपेक्षा करतात.

ह्या घराला १२ खोल्या आहेत. इथेच एक छोटे मंदिर आणि पुजारी देखील आहे. मात्र इथे राहायला परवानगी त्यांनाच मिळते जे जख्खड म्हातारे होतात आणि मरणाच्या दारात उभे असतात.. मुत्यु ची वाट बघणारे ही मंडळी २ आठवडे इथे राहू शकतात. रोजचे ७५ रुपये असे इथले भाडे आहे. ह्यामध्ये त्यांना एक खोली, त्यात एक खाटलं, एक चादर आणि उशी असे समान मिळते. पाण्याचा एक माठ ही भरून ठेवलेला असतो.

ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी असते त्यांच्या कडून अधिक भाडे घेऊन त्यांच्या साठी गायक देखील ठेवला जातो. इथे येणारऱ्यांना काही कापड्यांखेरीज बाकीचे कोणतेच जास्तीचे समान आणण्यास परवानगी नाही. ह्या खोलीत राहायला गेल्यावर तिथले पुजारी सकाळ संध्याकाळ आरती नंतर इथल्या मोक्ष याचकांवर गंगाजल शिपडतात आणि त्यांच्या मोक्षा साठी प्रार्थना करायची.

गायक, आरत्या, गंगाजल ह्या सगळ्या मुळे तिथले वातावरण सुद्धा खूप भारलेले राहते. कित्येक जण खरोखर २ आठवड्याच्या आताच स्वर्गवासी झाल्याचे दाखले आहेत. पण जर तुम्ही २ आठवड्यानंतरही जिवंत राहिलात तर हे स्थान तुम्हाला सोडावे लागते. तुम्ही बाहेरच्या हॉटेल किंव धर्मशाळेत आश्रय घेऊ शकता.. पण हे मुक्ती धाम फक्त २ आठवड्यासाठीच..!!

काही वर्षांनंतर तुम्ही पुन्हा काशी भवन मध्ये खोली साठी प्रयत्न करू शकता पण तिथला अवधी २ आठवड्यांचाच.. त्यात तुम्हाला मुक्ती मिळाली तर ठीक नाहीतर पुढच्या नंबर साठी जागा मोकळी करून द्यावीच लागते बरं..!! तसेही जो एकदा काशीला गेला तो काही पुन्हा येत नाही अशी आपली धारणा आहे.

खूप पूर्वी पासून घरातील वृद्ध काशी यात्रेला जायचे आणि पुन्हा परत यायचे नाहीत. जीवन मरणाच्या फेऱ्यातून काशीतच मुक्ती मिळेल असेच हिंदू मानतात. तिथे भरपूर पैसे उकळणारे कितीही हॉटेल असले तरी कशी मुक्ती धाम मात्र खरच मनापासून मुक्ती याचकांसाठी कमी पैशात सेवा करत आहे..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!