Loading...

परळीतून ‘या’ मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी 204 जागांवर महायुती जिंकेल, 69 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 15 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज ). परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2009 मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. यावेळी पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि आमदार झाल्या.

Loading...

या निवडणुकीत पंकजा मुंडेंना आमदारकीचं तिकीट मिळाल्यामुळे नाराज झालेल्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धनंजय मुंडे विधान परिषदेत आमदार झाले.

परळी मतदारसंघ पूर्वी रेणापूर म्हणून ओळखला जायचा. या मतदारसंघात एखादा अपवाद वगळला तर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.  पूर्वीच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे 5 वेळा आमदार झाले. 1985 ला मात्र पंडितराव दौंड यांनी गोपीनाथ मुंडेंचा पराभव केला. 2009 मध्ये पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. त्यानंतर 2 वेळा इथून पंकजा मुंडे आमदार झाल्या.

परळीमध्ये कोणतीही निवडणूक असली तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना पाहायला मिळतो. 2016 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या गटाने बाजी मारली. पंकजा मुंडे मंत्री असतानाही परळी नगरपालिकेत सत्ता आणू शकल्या नाहीत याची त्यावेळी खूपच चर्चा झाली. यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही  पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला.

Loading...

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हाच संघर्ष पाहायला मिळाला. मात्र भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात 19 हजारांचं मताधिक्य मिळालं.

पंकजा मुंडे या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री असल्याने परळीमध्ये त्यांचा दबदबा आहे. परळी विधानसभा मतदारसंघातल्या विकासकामांसाठी त्यांनी भरीव निधी आणला. त्यांचं हे काम आता त्यांना इथे पुन्हा एकदा विजय मिळवून देईल का ते पाहावं लागेल.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.