सिंहगडावर सापडली नरवीर तानाजी मालुसरे यांची देहसमाधी !

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांंच्यासह असलेले तानाजी मालुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत सहभागी असलेली व्यक्ती. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते.

सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती.

त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. स्वराज्यासाठी, राजमाता जिजाबाईंंच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेंना  दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते.

tanaji malusare

त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेउन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले.

Tanaji-movie-poster

आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.”हे त्यांंचे शब्दइतिहासात प्रसिद्ध पावले आहेत. सिंहगडावरचा हा पराक्रम इतक्या वर्षांनतरही आपल्या सर्वांच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय व स्वराज्य निर्मितीसाठी स्वत:च्या प्राणांची आहुतीचे स्मरण केल्याशिवाय राहत नाही.

नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार पुरातत्व विभागाच्या परवानगीने पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळा, समाधीस्थळाचे सुशोभीकरण आणि स्वराज्य निष्ठा शिल्पाचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ते सुरु असताना मालुसरे यांची देह समाधी मिळाली आहे.

खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांची हि समाधी बांधली यामुळे, शिवाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक अमूल्य असा ठेवा या समाधीच्या स्वरुपात महाराष्ट्राला मिळाला आहे.

तानाजी मालसुरे यांचा पुतळा बसविण्यासाठी सिमेंट चौथरा काढून तेथे दगडी बांधकामातील चौथरा बांधण्याचे नियोजन होते ते करत असतांनाच काँक्रीटचा ठोकळा काढल्यानंतर त्याच्या खाली एक चौकोनी दगड होता. त्याखाली समाधीचे वृंदावन सापडले. तर, पुतळ्याशेजारी एका चौकोनी दगडावर समाधीचा शिरोभाग होता.

ती आतापर्यंत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी म्हणून ओळखली जात होती.  वृंदावन व त्यावरील चौकोनी दगड व त्यावर शिरोभाग अशी जोडणी केल्यावर ही नरवीर तानाजी मालुसरे यांनी मूळ समाधी असल्याचे दिसून आले आहे.

 

नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारके

१. महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवले.

२. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.

 ३. पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

  ४.रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

हि माहिती आवडल्यास शेयर करायला विसरू नका

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!