पाकिस्तानची पाठराखण करणारे वक्तव्य केल्याने कपिल शर्मा शो मधून नवज्योत सिंग सिद्धूची हकालपट्टी !

0

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यावर नवज्योत सिंग सिद्धूनं प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. पण काही मूठभर लोकांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल अख्ख्या देशाला कसं जबाबदार धरता येईल? अशा प्रकारे त्यांनी पाकिस्तानचा बचावच केला होता. यावर सिद्धू यांच्यावर प्रचंड टीका होतेय. प्रेक्षकांचा रोष त्यांनी ओढून घेतलाय. त्याचा सगळीकडून निषेध होत होता.

पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी जे वक्तव्य केलं, त्याचा सगळीकडून निषेध होत होता. कपिल शर्मा शोमध्ये सिद्धूची मोठी भूमिका असते. तो शो एकतर बंद करावा किंवा त्यातून सिद्धू यांना काढून टाकावं अशी प्रेक्षक जोरदार मागणी सुरू होती.

जनतेच्या या रोषामुळे सोनीनं नवज्योत सिंग सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून काढण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धूच्या जागी आता अभिनेत्री अर्चना पुरण सिंगला घेतलं गेलंय. सिद्धू यांनी दहशतवाद्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असंही म्हटलं होतं. ते पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधीलाही गेले होते.

त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नापसंती दर्शवली होती. जेव्हा सिद्धू आणि पाकिस्तानचे सेना प्रमुख यांनी एकमेकांना आलिंगन दिलेला फोटोही ट्रोल झाला होता. आता प्रेक्षक सिद्धू यांना कपिल शर्माच्या शोमधून काढून टाकावं, नाही तर आम्ही शोवर बंदी घालू अशी मागणी करतायत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!