या अभिनेत्रीने लग्नाकरता ख्रिश्चन धर्म सोडून केला होता हिंदू धर्माचा स्वीकार, अजूनही आहे अविवाहित!

‘इमइक्का नोडिगल’, ‘कोलाइथुर कालम’, ‘जय सिम्हा’, ‘कोको’ सारख्या सिनेमांमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री नयनतारा यांचा 18 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. 2003 मध्ये एका मल्याळम सिनेमात काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच तिने तामिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. आतापर्यंत नयनतारा यांनी यशस्वी सिनेमे दिले आहेत. आता त्यांची ओळख सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये झाली आहे.

साऊथची सर्वात हॉट अभिनेत्री नयनतारा आता साऊथची सर्वाधिक चर्चित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नयनतारा आज तिचा 35 वा वाढदिवस (18 नोव्हेंबर 1984) साजरा करत आहे. बंगळुरु मध्ये जन्मलेली नयनतारा ख्रिश्चन आहे. तिचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे.

नयनताराचे वडील कुरियन कोदियात्तु एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे नयनताराचे देशातील विविध शहरांमध्ये शिक्षण झाले. तिचे शिक्षण चेन्नी, जामनगर, थिरुवला आणि दिल्लीत झाले. नयनतारा साऊथमधील सध्याच्या घडीची सर्वात महागडी स्टार आहे. नयनतारा एका फिल्मसाठी 3 कोटी रुपये चार्ज करते. तिच्याकडे 68 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.

नयनतारा 2008 मध्ये अॅक्टर, डायरेक्टर, डान्सर प्रभुदेवाच्या प्रेमात पडली होती. नयनताराने प्रभूदेवा यांना डेट करायला सुरूवात केली तेव्हा त्याच लग्न झालं असून त्याला 3 मुले होती. पण प्रेमात दोघे एवढे बुडाले होते की, त्यांना भान राहिलं नाही. दोघांनी लिवइनमध्ये राहण्यास सुरूवात केली होती.

नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवाना त्याचे 16 वर्षे जुने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. जुलै 2011 मध्ये प्रभुदेवाना त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. यानंतर 2012 मध्ये नयनताराने म्हटले की, आता प्रभुदेवासोबत माझे सर्व संबंध संपले आहेत. तिनेही त्याच्यासोबतचे संबंध तोडले.

याची माहिती जेव्हा प्रभूदेवाच्या पत्नीला झाली तेव्हा तिने 2010 मध्ये फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली. ज्यामध्ये प्रभूदेवा आणि नयनतारा लिवइनमध्ये राहत असल्याचा खुलासा केला होता. प्रभूदेवा यांच्या पत्नीने धमकी दिली की,जर त्यांनी लग्न केलं तर त्या उपोषण करतील. तेव्हा नयनतारा यांच्या विरोधात अनेक आंदोलन देखील झाली.

पत्नी लताला घटस्फोट दिल्यानंतर प्रभुदेवा अक्षरशः दिवाळखोर झाल्याच्या स्थितीत होता. त्याला पत्नीला 10 लाख रुपये निर्वाह भत्त्यासोबत प्रॉपर्टीही द्यावी लागली होती. याची एकूण किंमत 20-25 कोटी रुपये होती. त्यासोबत त्याने दोन कार आणि त्याची सर्व संपत्तीही लताला दिली होती. प्रभुदेवाला तीन मुले होती, 2008 मध्ये त्याच्या एका मुलाचा कँसरमुळे मृत्यु झाला होता.

मात्र यानंतर नयनतारा यांनी प्रभूदेवांसोबत असलेलं नातं संपवलं. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा नयनतारांनी प्रेमा खातर धर्म देखील बदलला होता. नयनतारा या जन्माने ख्रिश्चन होत्या पण त्यांनी प्रभूदेवांसोबत लग्न करण्यासाठी 2011 मध्ये हिंदू धर्म स्विकारला. मात्र 35 वर्षांच्या नयनतारा आजही अविवाहित आहेत.

नयनताराकडे बीएमडब्ल्यू एक्स 6 (किंमत साधारण 76 लाख) आणि ऑडी टीटी रोडस्टर (60 लाख) सारख्या लक्झरी कार आहेत. याशिवाय थिरुवला, केरळ येथे आलिशान बंगले आणि कोच्ची येथे प्रेस्टिज नेप्च्यून कोर्टयार्ड येथे शानदार फ्लॅट आहे. याशिवाय नयनतारा कित्येक ब्रँड्ससाठी एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही कमाई करते. यामध्ये जीआरटी ज्वेलर्स सारख्या कंपन्या आहेत. एका माहितीनुसार नयनताराने 50 सेकंदांच्या एका टीव्ही अॅडसाठी 5 कोटी रुपये चार्ज केले होते. या अॅडची शुटिंग दोन दिवस चालली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.