Loading...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल या ५ नवलाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे आणि “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा” हा अत्यंत ज्वलनशील विचारांचा नारा देणारे भारताचे अग्रणीय स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती आहे. २३ जानेवारी १८९७ मध्ये उडीसाच्या कट्टक मध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी सरकारी वकील म्हणून केली आणि मग स्वतःची प्राक्टिस सुरु केली. इंग्रज त्यांना रायबहादूर म्हणत. सुभाष चंद्र बोस आपल्या एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगून गेलेत आणि त्याचं मरणं हे कायम लोकांच्या मनात प्रश्न पाडून गेलं. आज मी तुम्हा त्यांच्या आयुष्याबद्दलच्या अश्याच काही खास आणि कुतूहलाच्या गोष्टी सांगणार आहे तर जास्त वेळ वाया न घालवता सुरु करूया.

देशभक्तांचे देशभक्त: स्वतंत्र भारत ही काय संकल्पना आहे हे फक्त सुभाष चंद्र बोसच समजू शकले म्हणून त्यांना देशभक्तांचे देशभक्तही म्हणत असे. म्हणतात कि असं एकही बलिदान नाहीये जे सुभाष चंद्र बोस यांनी देशासाठी केले नाही. त्यांचे हे बलिदान लक्षात घेता हजारो तरुण आणि तरुणींना प्रोत्साहन मिळायचे. त्यांचे राजकीय विचारही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकडे वळत होते फक्त पक्षात राहण्यासाठी नव्हे. सुभाषचंद्र बोस गांधीजींच्या विचारांच्या विरोधातही होते. कॉंग्रेस पक्षातील काही लोकं त्यांना समर्थन करत नव्हते पण त्यांच्या डोक्यात फक्त स्वतंत्र भारत हाच एकमेव विचार होता आणि मग त्यासाठी लागणारी मदत मागण्यासाठी त्यांनी काश्याचाच विचार केला नाही. देशासाठी काहीही करू हाच त्यांचा निश्चय.

दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त: हिंदीत एक खूपच नावाजलेली म्हण आहे – दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी तिला खूपच गांभीर्याने घेतले. ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलून लावणे खूपच महत्त्वाचे होते आणि मग ब्रिटीशांचे शत्रू म्हणजे जर्मनी आणि जपान यांची मदत घेण्याचे नेताजींनी ठरविले. ते जपानला गेले आणि जपानच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. जपानच्या मदतीने त्याच सेनेने अंदमान आणि निकोबार या द्विपसमूहावर स्वतंत्र लढा जिंकला आणि मग मणिपूरला आले. पण मग झालं असं कि दुसऱ्या महायुद्धात जपान कमकुवत देश झाला आणि त्यातून बाहेर पडला आणि मग याच कारणाने आझाद हिंद सेना मोडावी लागली.
नजरकैद: इंग्रजांनी नेताजींना नजरकैद करून ठेवलं होतं आणि मग त्यातून सुटका करण्यासाठी नेताजींनी एक युक्ती लढविली. १६ जानेवारी १९४१चा तो दिवस. त्यांनी महमद झियाउद्दीन नावाने पठाणी वेशभूषा धारण केली आणि पोलिसांची नजर चुकवत तेथून पलायन केले. शरदबाबूंचा मोठा मुलगा शिशिर याने त्यांना आपल्या गाडीतून कलकत्त्यापासून दूर गोमोह इथे सोडून दिले. गोमोह रेल्वेस्थानकावरून त्यांनी फ्रंटियर मेल पकडली आणि पेशावरला पोहचले. तिथे त्यांची एक सहकारी, मिया अकबर यांच्या मदतीने कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी ओळख झाली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

कारागृहातील तह: जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले आणि ती नाराजी समोरही दिसली.

Loading...

 

शेवटचा प्रवास: दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आजाद हिंद सेनेचे समर्थन काढून घेतले आणि आता पुढील मदत मिळविण्यासाठी नेताजी रशियाला निघाले. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजू ज्या विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते; ते विमान प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आणि मग कुणालाच दिसले नाही. २३ ऑगस्ट ला दोमेई वृत्तसंस्थेने “नेताजींचे अपघातग्रस्त विमान जमिनीवर आढळले आणि उपचार दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला” असे कळविले. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला. ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

Loading...

तर या होत्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल काही नवलाच्या गोष्टी आणि त्यांवर टाकलेला प्रकाश. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर शेयर करा. नेताजी सुभाष चंद्र बोस यांना टीम स्टार मराठीचा सलाम. जय हिंद.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.