सोनुने का सोडली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका !

मित्रांनो आपण नेहमीच टीव्हीवरील मालिकांना पसंती देत आलेलो आहोत.छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा देखील तेवढीच उठावदार आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला लोकांनी खुपच पसंती दिलेली आहे लोक आजही या मालिकेला मोठ्या प्रमाणात बघत आहेत. या मालिकेत अनेक पात्र अत्यंत योग्य पद्धतीने रंगवून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत.आज आपण माधवी व आत्माराम भिडे यांची एकुलती एक मुलगी सोनू भिडेच्या पात्राबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊयात.

या मालिकेमध्ये आत्माराम भिडे याला एका शिक्षकाच्या व्यक्तिरेखेचे मध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि या शिक्षकाची मुलगी म्हणजे सोनू होय. निधी भानूशाली आधी सोनूची भूमिका साकारत होती. पण तिने ही मालिका सोडली आहे.उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याचे कारण देत तिने या व्यक्तिरेखेला कायमचा रामराम ठोकला आहे. मालिकेमध्ये सोनू अत्यंत हुशार दाखवली आहे. व्यक्तीगत जीवनातही सोनू म्हणजेच निधीने शिक्षणाला पहिले प्राधान्य देत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

आधी झील मेहता सोनूची भूमिका साकारत असत. पण २०१२ मध्ये तिनेही मालिका सोडली आणि निधी म्हणजेच सोनूचा या मालिकेत प्रवेश झाला. अल्पावधीत तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. तिने अत्यंत कमी वेळेत स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार करण्यात यश मिळवले आहे. निधीने मालिका सोडल्यानंतर तिच्या जागेवर नवीन सोनूच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी शेकडो मुलींचे ऑडीशन घेतले होते पण त्या शेकडोंमधून पलक सिधवानीची निवड करण्यात आली आहे.

निधीने मालिका सोडल्यानंतर आता अभिनेत्री पलक सिधवानी सोनूची व्यक्तीरेखा साकारत आहे. पलक सिधवानीने तारक मेहतामध्ये काम करण्याआधी काही टीव्ही जाहिराती व लघुपटांमध्ये काम केले होते. मात्र त्यांचे स्वरुप फार लहान होते. “तारक मेहता ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी आहे. त्यासाठी लागणारी मेहनत मी करेन आणि संधीचे सोने करेन” असे मत पलक सिधवानीने व्यक्त केले होते.