बॉलीवुडचा सुप्रसिध्द गायक शानने गायले ‘वडिल-मुली’च्या नात्याला समर्पित करणारे गाणे !

0

असं म्हटलं जातं, वडिल हे त्यांच्या मुलींचे पहिले मित्र असतात. वडिल मुलींसाठी आदर्श असतात. वडिल-मुलीच्या ह्या सुंदर नात्याला डेडिकेट करणारे गाणे सुप्रसिध्द पार्श्वगायक शानने गायले आहे. शान ह्यांनी गायलेले ‘नो स्मोकिंग पापा’ हे सुंदर गाणे 1 जानेवारी 2019 ला लाँच होणार आहे.

व्हिडियो पॅलेसची प्रस्तुती असलेला डॉ. दीपा सुरेंद्र देसाई आणि अनुराज फास्टनर्स प्राइवेट लिमिटेड, आणि एडलिब्स प्रॉडक्शन्सचे ‘नो स्मोकिंग पापा’ हे गाणे प्रितीश कामतने लिहिले आहे. शानने गायलेल्या ह्या गाण्याला मितेश-प्रितेशने संगीतबध्द केलेले आहे. ह्याचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.

आपल्या गाण्याविषयी शान सांगतात, “मी नुकतेच हे गाणे पाहिले. हे गाणे जेवढे सुरेल झाले आहे. तेवढाच ह्याचा व्हिडीयोही मस्त झाला आहे. जेव्हा एखाद्या चांगल्या गाण्याचा तेवढाच सुंदर व्हिडीयो होतो, तेव्हा ते गाणे ऐकणे आणि पाहणेही खूप मजेदार असते. ह्या गाण्याच्या शेवटी एक छान ट्विस्ट आहे. जो मला अत्यंत आवडलाय. गाण्याचा टिझर नुकताच लाँच झालाय. ज्याचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की जेव्हा हे गाणे रिलीज होईल, तेहा हे लोकांच्या पसंतीस उतरेल.”

Teaser you tube link –

Teaser 2

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!