Loading...

बस कंडक्टर जुन्या तिकिटांवर छिद्र का पाडत असत?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

बसचा प्रवास त्या प्रवासीने एकून किती थांबे (Stops किंवा Stages) पार करून पुर्ण करायचा आहे त्यानुसार भाडे आकारले जाते, ना की त्यांनी किती किलोमीटर प्रवास केला आहे त्याने.

खाली आपण एक असेच तिकीट पाहूया:

Loading...

  1. तिकिटाचे थांबे क्रमांक “डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला” वाचले जातात. जास्तीत जास्त १ ते १९९ थांबे क्रमांक एका तिकिटावर असतात.
  2. तिकीट हे कोणत्या गाडीचे नसून कोणत्या मार्गावर आपण प्रवास करतोय त्यानुसार ठरलेले असते आणि वाहकाच्या पेटीमध्ये फक्त त्याचा क्रमाकांची तिकिटे दिली जातात ज्यावर तो प्रवास करणार आहे. (हा क्रमांक एकदम डाव्या बाजूला निळ्या नंबरमध्ये आहे.)
  3. दुसरा मोठा क्रमांक हा ६ आकडी असून तो तिकिटांचा क्रमवार दाखवतो. तुम्ही उद्या उठून परत तेच तिकीट त्याच मार्गावर वापरले तर हा क्रमांक सध्या कोणता क्रमांक सुरु आहे त्याच्याशी मेळ खात नाही आणि अशारीतीने जुने तिकीट ग्राह्य धरले जात नाही. शिवाय वाहकाकडे कोणत्या नंबरची सिरीज कोणत्या मार्गावरची आहे हे लिहलेले असतेच.
  4. डाव्या कॉलमपासून तुम्ही कुठे बसला तिथे छिद्रे पडून तुम्ही कुठे उतरणार त्या थांब्यावर उजव्या बाजूला दुसरे छिद्रे पाडले जाते.

उदाहरण:

समजा, मले!! माफ करा!, मला अमरावतीहून मुंबईला यायचं आहे. ह्यात ५० थांबे लागतात. आपली बस नागपूरहून निघाली आहे आणि अमरावती हा पाचवा थांबा आहे. जेव्हा तुम्हाला वाहक तिकीट देईल तेव्हा तो डाव्या बाजूच्या पहिल्या कॉलममध्ये ० ह्या ठिकाणी आणि त्याच्या बाजूच्या कॉलमच्या ५ ह्या ठिकाणी छिद्रे पाडेल. म्हणजेच पासून ह्या रकान्यात ०५ अर्थात पाचवा थांबा इथून प्रवास सुरु झाला आहे.

तसेच जर मुंबई त्या मार्गावरील ५० वे स्थान असेल तर उजव्या बाजूच्या पहिल्या कॉलममध्ये ५ आणि शेजारच्या कॉलममध्ये ० ह्या ठिकाणी छिद्रे पडतील अर्थात पर्यंत ह्या रकान्यात ५० व थांबा.

आता समजा गाडी उलट दिशेने चालली आहे. मुंबईकडून नागपूरला आणि तुम्हाला तोच प्रवास करायचा आहे तर तुमच्या पासून रकान्यात ५० (पहिल्या कॉलममध्ये ५, दुसर्या कॉलममध्ये ०) आणि पर्यंतच्या रकान्यात ०५ (पहिल्या कॉलममध्ये ०, दुसर्या कॉलममध्ये ५) असे छिद्रे असतील. लक्षात घ्यावे की एकाच मार्गावर थांबे क्रमांक हे फिक्स्ड असतात.

वाहकाला एक एक थांबापासून उर्वरित थांब्यांचे तिकीट दर तोंडीपाठ असतात कारण ते त्यांचे दररोजचे काम असते. आणि कोणत्या थांब्याला कोणता क्रमांक आहे हे सुद्धा त्यांना माहिती असते. ते बरोबर तेवढ्या रुपायचे तिकीट काढतात आणि बरोबर तेवढी छिद्रे पाडतात.

Loading...

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.