वयाच्या ७३ व्या वर्षी या जोडप्याने केले, लग्न गावकऱ्यांनीही मोठ्या आनंदात लावले लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

‘स्वर्गात जोड्या बनवतात.’ तुम्ही हि म्हण बर्‍याच वेळा ऐकली असेल. वास्तविक जीवनात देखील ही गोष्ट बर्‍याच वेळा पाहायला मिळते. जेव्हा आपल्याला आपला खरा जोडीदार सापडतो तेव्हा आपण तिच्याशी/त्याच्याशी लग्न करण्यास उशीर करत नाही. तरी, असे काही लोक आहेत जे लग्न न करता एकमेकांसोबत राहणे पसंत करतात. आधुनिक भाषेत त्याला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणतात.

अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला एक ज्येष्ठ जोडप्यासह परिचित करणार आहोत जे संपूर्ण 50 वर्ष लाइव्ह इनमध्ये वास्तव्य करीत आहे आणि आता नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत आहे. छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यातील खैरझीटी कला गावात जेव्हा हे लग्न पाहिले तेव्हा वधूचे वय 67 वर्षे आणि वराचे वय 73 वर्षे असल्याचे समजताच लोकांना आश्चर्य वाटले.

आता या वृद्ध जोडप्याचे लग्न सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. शनिवारी अखेर संपूर्ण गावात या लग्नाची चर्चा झाली. बर्‍याच लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटले की 73 वर्षांचा वर सुकल निषाद आणि 67 वर्षीय वधू गौतरहिन बाई गेल्या 50 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. वास्तविक, या दोघांनाही लिव्ह इन रिलेशनशिप काय आहे ते माहित नाही.

गोष्ट अशी होती की या दोघांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती, अशा परिस्थितीत दोघांनाही लग्न करणे परवडणारे नव्हते. म्हणून 50 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा दोघांनीही लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान वृद्ध वराने सांगितले की, ते 50 वर्षापूर्वी बेमेतारा जिल्ह्यातील बिरसिंगी येथे आपल्यासाठी एका मुलगी पाहायला गेले होते. ज्या मुलीला भेटायला ते गेले होते तिच्या लहान बहिणीवर त्यांना प्रेम झाले. सुकल हा मजूर म्हणून काम करायचा, म्हणून त्याच्याकडे लग्नासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत सुकल आणि गौतरहिननं ठरवलं की लग्न न करता एकत्र राहू. विशेष म्हणजे लग्न झालेले नसताना देखील त्यांच्या कुटुंबाने किंवा कामाजाने कोणताही आक्षेप घेतला नाही.

अलीकडेच सुकलने गावातील आपल्या एका मित्राकडे इच्छा व्यक्त केली की त्याला आपल्या जीवनात हिंदू रूढी परंपरांनी लग्न करायचे आहे. त्यांचा असा विश्वास होता की लग्नाशिवाय जीवनात मोक्ष प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीत त्याच्या मित्राने गावातील उर्वरित लोकांना आणि सुकलच्या मुलांना सांगितले. मग प्रत्येकजणाने त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला आणि दोघांनीही संपूर्ण विधीद्वारे लग्न केले. सुकल आणि गौतरहिन यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. याशिवाय त्यांना नातवंडेही आहेत.

त्यांच्या लग्नात गावक्यांनीही त्यांना आर्थिक पाठबळ दिले. हे लग्न मोठ्या आनंदात साजरे झाले. 50 वर्षांनंतर गौतरहिनशी लग्न करून सुकलला खूप आनंद झाला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.