चष्मा नको असेल तर करा हा रामबान ऊपाय !

0

डबल बॅटरी सिंगल पॉवर किंवा ढापण्या ह्या नावाने चष्मीश माणसाचा उद्धार होत असतो. काहींना तर अगदी लहानपणापासूनच चष्मा लागतो. काहींना तरुणपणी तर काहींना चाळिशीचा तरी नक्कीच लागतो.. पण आपल्याच घरातले आज्जीआजोबा मात्र अजूनही बिनचष्म्याने सकाळी उठून पेपर वाचताना दिसतात. अंधार पडल्यावर ट्यूब लाईटच्या प्रकाशातही पोथ्या, ग्रंथ वाचन कोणत्याही चष्म्याशिवाय चालते.

त्यांनी असे काय केले असेल की वयाच्या साठी सत्तरी नंतरही त्यांची दृष्टी इतकी उत्तम असते. आपण मात्र चष्मे लावून फिरतो..खरे तर डोळ्यांचे काही मेडिकल प्रॉब्लेम्स सोडले तर लागलेल्या चष्म्याला ९०% आपण स्वतःच जबाबदार असतो.. अंधारात वाचन करणे परिपूर्ण आहार न करणे ह्या गोष्टींमुळे आपली दृष्टी कमजोर होते. आयुष्यातील ताणतणाव, टेंशन्स, कमी झोप इतकेच काय तर सूर्याची अतिनील किरणे हे सुद्धा आपल्या दृष्टीवर वाईट परिणाम करतात.

आता तर काय गॅजेट्स च्या जमान्यात मोबाईल, ललापटॉप, टीव्ही हे सगळेच आपल्याला ढापण लावण्यास सज्ज झालेले आहेत. कुठल्याही गॅजेटचा स्क्रिन ब्राईटनेस हा आपल्या डोळ्यांसाठी घातक आहे. लहान मुलांना तर हे गॅजेट्स देऊच नयेत. पण हल्ली जन्मापासून सगळेच गॅजेट फ्रीक झालेले दिसतात. आता ह्या टेक्नॉलॉजीला, रोजच्या धकाधकीच्या जीवनाला तर नाही म्हणू शकत नाही. पण चेहऱ्याच्या सौन्दर्याला बिघडवणारा चष्मा तर नाही लागू द्यायचा मग करावे तरी काय..?

 

 आपल्या डोळ्यांना कोरडे होऊ देऊ नका : डोळे कोरडे पडल्यास निस्तेज होतात. त्यातील ओलावा कधी कमी होऊ देऊ नका. ए सी मध्ये असाल तर किंवा फॅन खाली असताना डोळ्याला डायरेक्ट वारं लागणार नाही ह्याची काळजी घ्या. बाईकवरून जाताना गॉगल वापरा. कोरडे डोळे आंधळेपणा आणू शकतात हे लक्षात ठेवा.

डोळ्यांवर पाणी मारत राहा: दिवसातून २ – ३ वेळा किंवा बाहेरून जाऊन आल्यावर थंड पाण्याचे शिडकावा डोळ्यांवर मारा. खूप बरे वाटेल आणि त्यातील ओलेपणा टिकून राहील.

हात घासून डोळ्यांना ऊब द्या: हातावर हात घासून गर्मी निर्माण होते. हे हात डोळ्यांवर ठेवून त्याची ऊब डोळ्यांना मिळू द्या. तारवटलेल्या डोळ्यांना आराम मिळेल.

गॅजेट्स चा वापर करताना घ्यायची काळजी: कोणतेही गॅजेट्स वापरताना त्याचा ब्राईटनेस योग्य ठेवा. अंधारात शक्यतो कोणतेही गॅजेट वापरू नका. सतत कॉम्प्युटर वर काम करत असल्यास मध्ये मध्ये डोळ्यांचे व्यायाम करा. डोळ्यांची उघडझाप देखील बऱ्याचदा केली गेली पाहिजे.

डोळयाच्या स्वास्थ्यासाठी आहार: शरीरात काही पोषणमूल्ये योग्य प्रमाणात गेल्यास डोळ्यांवचे बरेच रोग आपल्या आपण दूर होऊ शकतात. आपल्या आहारात मासे घ्या. आठवड्यातून ३ वेळ मासे खाल्ल्यास ड्राय आय सिंड्रोम कमी होतो. गाजर, पालक हे देखील डोळ्यांना उपयुक्त आहेत. ह्याने नजर सुधारते. दृष्टी सुधारण्यास अंडी सुद्धा उत्तम. अंड्यांमध्ये ल्युटीन आणि जियाक्साथिन असते जे डोळ्यांसाठी चांगलेच..!!

हे छोटे छोटे बदल आपल्याला नक्कीच डोळ्याच्या सगळ्या त्रासापासून दार ठेवतात. मात्र डोळ्यांना जास्ती त्रास होत असेल डॉक्टर कडे जाणे गरजेचे आहे. दृष्टी चांगली असली तरी सुद्धा मधून मधून डोळ्यांची तपासणी करणे उत्तम.. तर मंडळी तुम्ही ही चष्मा विरहित आयुष्य जगायला तयार व्हा..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!