“पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे लावा आणि चिकन लेग पीस वर सूट मिळवा.

0

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशात कमालीचा आक्रोश दिसतोय. याची जबाबदारी जैश ने घेतली असली तरी जैश ला वाढायला जागा देणाऱ्या पाकिस्तानवर भारताने हल्ला चढवला आहे. अनेक व्यावसायिक संबंध संपविले आहे आणि अनेक कठोर पाउल उचलले आहेत सोबतच जगदलपूर येथे एक खाद्य स्टॉल वाल्याने सुद्धा एक पाऊल उचलले आहे.

जो कुणी स्टॉल समोर “पाकिस्तान मुर्दाबाद” चा नारा लावेल त्याला “चिकन लेग पीस” वर १० रुपयांची सूट. जगदलपुरचा हा स्टॉल अंजल सिंह चालवतो. झटका चिकन तंदूर नावाने सुरु केलेला हा स्टॉल आता ग्राहकांना नवीन संधी देतोय. स्टॉलसमोर या, “पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे लावा आणि चिकन लेग पीस वर सूट मिळवा.

अंजल सिंग म्हणाले: “पाकिस्तान मानवतेला कधीही महत्त्व देत नाही आणि ते कधीच देणार नाहीत म्हणूनच प्रत्येकाला पाकिस्तान मुदाबाद म्हणावं लागेल. ‘या ट्विटवर 528 आवडी आणि 161 री-ट्विट्स आहेत. लोक त्यांचे चित्र बरेच काही शेअर करत आहेत.

अंजल सर्वच प्रकारचे चिकनचे पदार्थ आपल्याकडे बनवतात. लोकांना त्यांचं चिकन सुद्धा खूपच आवडतं. या “पाकिस्तान” मुर्दाबाद वाल्या पोस्टर नंतर अंजल फक्त आपल्या क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आहेत. फेसबुक, ट्वीटर आणि व्हाट्सअप सारख्या सोशल मिडीयावर त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

 

देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात शहीदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आणि पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची मागणी सुद्धा यात केली जात आहे. आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवाम हल्ल्यात आपण आपले ४० पेक्षा जास्त जवान गमावले. याचा आक्रोश दाखविण्यासाठी अंजल सिंह यांनी केलेला पराक्रम तुमच्या समोर आहे.

जर तुम्ही जगदलपूरमधील कोणत्या ठिकाणजवळ असाल तर या देशभक्ताच्या ठेल्यावर जाऊन पहा आणि त्याचे चिकन लेग पीस खाऊन पहा. आनंद होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!