Loading...

उघड्यावरची पाणी-पुरी खाण्याअगोदर हे नक्की वाचा

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

पाणी-पुरी हे नाव ऐकताच सर्वांच्या तोंडाला पाणी येते. मुलांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचा हा आवडता पदार्थ आहे. परंतु रस्त्यावर बनलेली ही पाणीपुरी आपल्या आरोग्यास किती घातक आहे हे आपणास माहिती आहे काय?

जिनोहेलिक्स बायोलॅब आणि जैन युनिव्हर्सिटीच्या सूक्ष्म-जीवशास्त्र विभागात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पाणी-पुरी च्या पाण्यात बहुतांश रोग-कारक बॅक्टेरिया असतात. E. coli, Vibrio cholerae, Shigella सारखे किटाणू मिळाले आहेत.

Loading...

अशा पाण्यात बहुतेक वेळा Coliforms आढळतात. काय आहेत Coliforms? Coliforms म्हणजे असे जीव जे नैसर्गिकरित्या मनुष्य आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात. मलत्यागाने हे शरीराबाहेर फेकले जातात. पाण्यामध्ये अशा जीवांची उपस्थिती पाणी प्रदूषण दर्शवते ज्याला शास्त्रीय भाषेत Fecal contamination (फिकल कंटामिनेशन) असे म्हणतात. E. coli, Enterococcus faecalis हे Coliforms चे उदाहरण आहेत. बहुतांश E. coli हे घातक नसतात परंतु काही E. coli उलटी, हगवण ह्यांसारखे रोग पसरवतात.

E. coli सारखेच Vibrio cholerae, Salmonella typhi, Shigella, Staphylococcus aureus, Pseudomonas सारखे किटाणूसुध्दा असू शकतात. ज्यामुळे अतिसार, उलट्या, ओटीपोटात वेदना, डोकेदुखी, कॉलरा , टायफॉइड, मूत्रमार्गाचा संसर्ग ह्यांसारखे रोग होतात.

Loading...

पाणी-पुरीचे पाणी हे अम्लीय म्हणजेच acidic असते ज्यामुळे पाण्यात यीस्टसुद्धा असू वाढू शकतात. जे ताप, अतिसार सारख्या आजाराचे कारण आहेत. अशा दूषित पाण्यात हेपेटायटीसचे विषाणू देखील असू शकतात

पाणी पुरीची पुरी मुख्यतः वापरलेल्या तेलाला गरम करून बनविली जाते. मार्च 2019 मध्ये केलेल्या प्रयोगातून असे सिद्ध झाले आहे की अशा वापरलेल्या तेलाच्या सेवनाने स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते.

पाणी पुरीमध्ये वापरलेले पाणी आणि बटाटे हे आजारांचे मुख्य कारण असल्याचे चेन्नईमधील सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यामध्ये ह्या सर्व आजारांचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळेच वडोदरा येथे जुलै 2018 मध्ये, कावीळ, अतिसारामुळे पाणीपुरीवर बंदी घालण्यात आली होती.

या सोबतच, पाणी पुरी विकणार्या व्यक्तीचे आरोग्य, त्याच्याद्वारे अवलंबले जाणारे स्वच्छतेचे मार्गदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर पाणी पुरी विकणार्या व्यक्तीचे हात, नखं स्वच्छ नसतील तर त्यातून Pinworm, Hookworms सारखे जीव खाण्यात येऊ शकतात.

तेव्हा पुढच्या वेळी उघड्यावरची पाणीपुरी खाण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टी काढून टाका. चांगले खा, निरोगी रहा.

लेखिका: भक्ती तायडे

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.