फक्त एका हेक्टरमध्येच होईल 10 लाख रुपयांच्या पपईचे उत्पन्न, अशी करावी शेती

1

नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा शेतीविषयक माहिती घेऊन मी आलोय आपल्या भेटीसाठी. जर तुम्हाला तुमच्या कमी जागेतच जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर “पपई”चे पिक घेणे हा एक सर्वोत्तम मार्ग राहू शकतो. बाजारात नुकत्यात आलेल्या पपईच्या संकरीत जाती भरगोस उत्पन्न देत आहे म्हणून अनेक शेतकऱ्यांचा कल तिकडे झुकलेला आहे. २ एकर शेतात तुम्ही सुमारे ७ लाख ते १० लाख इतके उत्पन्न घेऊ शकता. हा आकडा काही आपल्या मानाने काहीही सांगत नाहीये तर अनुभव आणि परीक्षणाचे परिणाम तुम्हाला सांगतोय.

पपईची सर्वात चांगली गोष्ट तर हीच आहे कि पपईचे झाड लवकरच तयार होते आणि वर्षभर तुम्हाला उत्पन्न देते. एकाच झाडापासून तुम्ही ३ ते ४ वर्षे उत्पन्न घेऊ शकता आणि याच कारणाने एकदा झाड तयार झालं कि त्यामागे तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागते. तर चला, मी सांगतो कशी करायची ही शेती ज्याने तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न होईल.

बहुतांश भागात होऊ शकते शेती: पपईची शेती करण्यासाठी संपूर्ण भारतात पूरक वातावरण आहे. ३८ ते ४४ डिग्री तापमानात हे पिक घेतल्या जाऊ शकते. असं तापमान संपूर्ण भारतात आढळते. पपईच्या शेतीसाठी सर्वात कमी तापमान ५ डिग्री पाहिजे. तुमच्या क्षेत्रात ५ डिग्री पेक्षा कमी तापमान असले तर ते पपईच्या शेतीसाठी उपयोगी नाहीच. म्हणण्याचा अर्थ आहे कि पहाडी क्षेत्रात सुद्धा ही शेती केल्या जाऊ शकते. म्हणजे भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही पपईची शेती करू शकता.

बाजारात उपलब्ध असलेल्या जाती: बाजारात आता अनेक प्रकारच्या देशी आणि विदेशी जाती अस्तित्वात आहेत. काही नैसार्गीत तर काही संकरीतही आहेत. पुसाच्या वतीने अनेक प्रकारच्या पपईच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. पुसा मजेस्ती, पुसा जायंट, वाशिंग्टन, सोलो, कोईम्बटूर, कुंर्गह्नीड्यू, पुसा ड्वार्फ, पुसा डेलीशियस, सिलोन, पूसा नन्हाल इत्यादी समाविष्ट आहेत. विदेशी जातीत तैवानी रेड लेडी आणि काही इज्राय्ली जास्ती सुद्धा समाविष्ट आहेतच; त्यांचे सुद्धा चांगले पिक येते.

उत्पन्न: अलाहबादच्या (प्रयागराजच्या) एका शेतकऱ्याने, हर्शेषने आपला अनुभव सांगताना म्हटले आहे कि एक निरोगी झाड सुमारे ४० किलो उत्पन्न देऊ शकते. प्रत्येकी २ झाडांत निदान ६ फुटांचे अंतर ठेवले पाहिजे. जर अशी लागवड केली तर तुम्ही अडीच एकरात (1 हेक्टरमध्ये) २२५० झाडे लावू शकता. अश्या प्रकारे तुम्ही पपईच्या एका सीजन मध्येच सुमारे ९०० क्विंटल उत्पन घेऊ शकता.

सावधानी: हर्शेषचं म्हणन आहे कि पपईचे झाड खूपच संवेदनशील असते म्हणून त्याच्या जवळपासच्या तापमानाबद्दल खूपच जास्त काळजी घेतली पाहिजे. अति जास्त उष्णता आणि कडाक्याची थंडी – दोन्ही गोष्टी पिकाला नुकसानदायी असू शकतात. शेताच्या उत्तरेस आणि पश्चिमेस हवा थांबविण्यासाठी व्यवस्था करावी. दव पडण्याच्या काळात शेतात धुवा करून सिंचन पद्धती वापरावी. जास्त पाणी सुद्धा पिकला नुकसानदायी होऊ शकते म्हणून जास्तीच्या पाण्याचा किंवा शेतात जमा झालेल्या पाण्याच्या योग्य निचरा करता येईल एवढी दक्षता घ्यावी. कॉलर रॉट नावाच्या बिमारीपासून सुटका मिळू शकते.

मिळकत: प्रती हेक्टर शेतीत तुम्हाला प्रत्येक सीजनला १० लाखांपर्यंत उत्पन्न होऊ शकते. हर्शेष म्हणतो कि तुम्हाला उत्पन्न झालेली ९०० क्विन्टल पपई १५ रुपये प्रती किलोच्या भावाने विक्या जाते. ठोक भाव सांगतोय. म्हणजे एका क्विन्टल मागे १५०० रुपये. या हिशेबाने साडे तेरा लाखांचे उत्पन्न होऊ शकते. पकडून चला कि सुमारे ३ लाख रुपये शेतीवर खर्चे केले आणि २०-२५ हजारांचे बीज. २५-३० हजारांचा इतरत्र खर्च पकडला तरी तुम्हाला १० लाखांचे नेट उत्पन्न होऊ शकते.

संपर्क: जर तुम्हाला या शेतीमध्ये प्रयोग करण्याची किंवा अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर १८००-१८०-१५५१ या नंबर वर संपर्क करू शकता.

 

अपेक्षा आहे, तुम्हाला हा लेख आवडला असेल.आवडला असेल तर आपल्या सहकाऱ्यांशी नक्की शेयर करा.

1 Comment
  1. Avatar
    Azar patel says

    I am interested

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!