१५ लाख सैनिकांच्या जीवनाशी संबंधित मोठा निर्णय घेण्यासाठी पर्रिकरांनी केवळ घेतली 25 मिनिटे !

0

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल अग्नाशयी कर्करोगाने निधन झाले. भारतचे संरक्षण मंत्री असताना पर्रिकर यांनी जनतेवर कधीच न मिटणारी छाप सोडली होती. ते एक अतिशय साधे आणि अंतर्ज्ञानी व्यक्ती होते जे आपल्या निस्वार्थ मनाने लोकांना भेटायचे. सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल जे. एस. संधू यांनी त्यांच्याशी संबंधित अशा काही आठवणी नुकत्याच सामायिक केल्या. ले कर्नल संधू सांगतात कि पर्रीकर संरक्षण मंत्री असताना अर्ध्या तासात त्यांनी सैनिकांचा विमा निधी कव्हर वाढविला होता तेही प्रीमियम जैसे थे ठेवता.

ले कर्नल संधू म्हणतात कि ते अनेक संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांना यापूर्वी लष्करी विमा कवर बद्दल संपर्क साधला होता पण निर्नार्य तर दूर, कुणी याची घेणे देखील आवश्यक समजले नाही. लष्करी सेवेत कार्यरत असलेल्या १५ लक्ष सैनिकांना (अधिकारी आणि जवान) सामान्य नागरिकांच्या समतुल्य नागरी विमा मिळवून देण्याची लढाई लढत असलेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल जे.एस. संधू यांनी मनोहर पर्रीकर यांच्या मृत्युनंतर आपला शोक व्यक्त केला आहे. ते म्हणतात की पार्रिकर नेहमीच सेना आणि सैनिकांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असत.

लेफ्टिनेंट कर्नल जे. एस. संधू यांनी 17 पुना हॉर्सशी संबंधित मनोहर पर्रिकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीबद्दल सांगितले. त्यांनी सैन्याच्या विविध विषयावर आणि समस्यांवर विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण संवाद साधण्याचा प्रयत्न केला ओत पण जेव्हा त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना पत्र लिहिले, तेव्हा मनोहर साहेबांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि भेटीचा प्रसातावाही ठेवला. जेव्हा संरक्षण मंत्रालयात त्यांची भेट झाली तेव्हा संधू यांनी सेवातर सैन्याचे कव्हर विमा मध्ये वाढ करण्यासाठी आणि वयाच्या 40व्या वर्षीच सेवानिवृत्त होणाऱ्या जवानांना कायमचा विमा संरक्षण देण्याचे मुद्दे उपस्थित केले होते.

25 मिनिटे चाललेल्या या बैठकीत मनोहर पर्रीकर यांनी झटपट सर्व बाबी समजून घेतल्या आणि आणि लगेच एका वरिष्ठ लष्करी जनरल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून योग्य त्या निर्णयाचा अहवाल संरक्षण मंत्रालयला द्यायला सांगितला. जवळजवळ 4 महिन्यातच मनोहर साहेबांनी सेवारत अधिकाऱ्यांचे कवर ६० लाखांवरून ७५ लाख केले तर कनिष्ठ अधिकारी (JCOs) ज्यात डिफेंस सर्विस कोर आणि एपीएस समाविष्ट होते त्यांचे कवर ३० लाखांवरून ३७ लाख करण्यात आले.

संधू यांनी रक्षा मंत्रांना सांगितलं कि सामान्य माणसांना विमा कंपन्या खूप कमी दरात खूप जास्त कवर देते पण एजीआईएफ मुले जवानांना ती संधी मिळत नाही आणि ले कर्नल संधूची गोष्ट ऐकल्यानंतर त्यांनी एकदम झटपट निर्णय घेतला. असा झटपट आणि योग्य निर्णय घेणारा नेता आणि देशाचा महामेरी एका दीर्घ आजाराने काळाच्या पडद्याआड झाला. स्टार मराठी कार्यकर्त्यांचा त्यांना मनाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!