Loading...

शाहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीने केली हि कौतुकास्पद कामगिरी !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना जाऊन अजून वर्षही झालं नाही. येत्या ७ ऑगस्टला त्या घटनेला एक वर्ष होईल. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्याच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी मिलेक्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला. वीरपत्नी कनिका कौस्तुभ राणे. सलाम..!

Loading...

शिवाय वर्षभरातच त्यासाठी हवी असणारी सर्व पूर्वतयारी केली. अपेक्षित परीक्षा दिल्या. आणि कालच अशी बातमी आली की, मिलेक्ट्रीत भरती होण्यासाठी कनिका राणे यांनी दिलेल्या परीक्षेत त्या अव्वल क्रमांकाने उत्तीर्णही झाल्या. शिवाय लवकरच पुढच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथेही जाणार आहेत. एक पती म्हणून कनिका राणे यांच्या जगण्याचा खंबीर आधार असणाऱ्या शहीद मेजर राणे यांच्या अकाली निघून जाण्यानंतर स्वतःला सावरणं.

Loading...

त्यातही पुन्हा स्वतः मिलेक्ट्रीत जाण्याचा निर्णय घेणं. त्यासाठी आवश्यक त्या परीक्षांची तयारी करणं. त्यातही अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणं. व पुन्हा भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वर्षभराच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथे जायला सज्ज होणं हे कनिका राणे यांनी घेतलेले सर्व निर्णय हे त्यांच्या अजोड ध्येयवादाची साक्ष देणारे आहेत.

वीरपत्नी कनिका राणे, आपल्या त्यागाला, संघर्षाला आणि ध्येयवादाला आमचा सलाम…!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.