CID इन्स्पेक्टर दयाची पत्नी आहे खूपच सुंदर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना ही देते मात!

मंडळी तुम्हाला सोनी टीव्हीवरील सीआयडी ही मालिका नक्कीच आठवत असेल. या मालिकेने तब्बल 21 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा रसिकांनी डोक्यावरती उचलून धरल्या होत्या. मग ती व्यक्तीरेखा एसीपी प्रद्युमन यांची असो, इन्स्पेक्टर अभिजीत याचे असो किंवा इन्स्पेक्टर दया यांची असो‌.

एसीपी प्रद्युमन यांचा “दया तोड दे दरवाजा” हा संवाद तर आजही रसिकांच्या स्मरणात आहे आणि आज देखील सामान्य प्रेक्षक याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर करताना दिसून येईल. एसीपी प्रद्युमान यांच्याप्रमाणेच इन्स्पेक्टर दया ही व्यक्तीरेखा देखील प्रचंड फेमस झाली होती. आज आपण याच इन्स्पेक्टर दया च्या परिवाराबद्दल आणि त्याच्या सौंदर्यवान बायको बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊ यात काय आहे हे प्रकरण…..

सीआयडी या टीव्ही मालिकेमधून उदयास आलेला अभिनेता म्हणजे दयानंद शेट्टी, इन्स्पेक्टर दया ने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सीआयडीमध्ये उत्कृष्ट बॉडी लँग्वेज आणि त्यासोबतच दमदार डायलॉग मुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण आज आपण इन्स्पेक्टर दयाच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी माहिती क्वचितच तुमच्यापर्यंत पोहोचली असेल….

दयानंद शेट्टी यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी कर्नाटक राज्यामधील उडुपी या शहरामध्ये झाला. त्यांचे लग्न स्मिता शेट्टी यांच्यासोबत झाले. दया त्यांच्या पत्नीला प्रचंड प्रेम करतात. इन्स्पेक्टर दया यांची पत्नी हाउसवाइफ जरी असली तरी ते एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीला ही लाजवेल एवढी सौंदर्यवान आहे.

दया सुरुवातीला मॉडेल म्हणून काम करत असे आणि 1998 रोजी त्यांना सीआयडी या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली दयानंद शेट्टी यांनी आजपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपली कला सादर केलेली आहे. त्यांनी आजपर्यंत गूटरगु, सिंघम रिटर्न्स, सूर्या द सुपर कॉप, रणवे, जॉनी गद्दार, दिलजले आणि सीआयडी यासारख्या प्रसिद्ध चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

दयानंद शेट्टी यांचं वय आज पन्नास आहे. त्यांच्या लग्नाला देखील अनेक वर्ष झालेली आहेत. आज दयानंद शेट्टी मालिका सोडून चित्रपटांमध्ये देखील काम करत आहेत परंतु आज देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल झालेला नाही. दयानंद शेट्टी सुरुवातीला खेळामध्ये करियर करू इच्छित होते परंतु खेळामध्ये दुखापत झाल्यामुळे त्यांना एक्टिंग मध्ये करियर करावे लागले.

सीआयडी मालिकेमध्ये शिवाजी साटम आणि आदित्य श्रीवास्तव नंतर तब्बल वीस वर्ष फक्त दयानंद शेट्टी यांनीच काम केलेलं आहे. इन्स्पेक्टर दया ही व्यक्तिरेखा एवढी प्रचंड प्रसिद्ध झाली की लोक आज देखील त्यांची नक्कल करत असतात. दयानंद शेट्टी 2014 मध्ये “खतरो के खिलाडी” या रियालिटी शोमध्ये देखील दिसून आला. इन्स्पेक्टर दया या व्यक्तिरेखेसाठी आज पर्यंत दयानंद शेट्टी यांना अनेक अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.