मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ च्या सर्व चाहत्यांना खुशखबर..! पहा काआहे ती खुशखबर

आपल्यासगळ्यांची लाडकी अभिनेत्री, प्राजक्ता माळी हिने नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. एकेकाळी अत्यंत लोकप्रिय झालेली, आणि आजही सगळ्यांच्या आवडीची असणारी ‘जुळून येति रेशीमगाठी’ ही मालिका प्राजक्ता स्वीकारणार नव्हती. हिंदी मालिकेत काम करण्याची तिची खूप इच्छा होती. त्यामुळे उत्तम कथानक असूनही, ही मालिका न स्वीकारण्याचा तिचा विचार होता. मात्र, ‘झी’सोबतकाम करायचे आहे, हे कळल्यावर तिच्या आईने, तिला मालिका स्वीकारायला सांगितली. प्राजक्ताने साकारलेली मेघना ही व्यक्तिरेखा आजही, सगळ्यांच्या आठवणीत आहे. ‘जुळून येति रेशीमगाठी’ या मालिकेमुळेच, तिला ही नवी ओळख मिळाली.

हीच मेघना आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे. आदित्य आणि मेघनाची गोड प्रेमकहाणी, आता ‘झीयुवा’ वाहिनीवर पाहायला मिळत आहे. २७ जुलैपासून, सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ वाजता ही मालिका बघता येणार आहे.हीदर्जेदार मालिका पुन्हा बघायला मिळत असल्याने, सारीच चाहते मंडळी खूप खुश आहेत.

त्याचप्रमाणे, मालिकेचे पुनर्प्रक्षेपण होत आहे, म्हणून सर्वच कलाकार मंडळी सुद्धा खूपच आनंदी आहेत. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी ही मालिका पुन्हा पाहण्याची संधी त्यांना मिळणार आहे. जुळूनयेति रेशीमगाठीमालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झाल्यानंतर, प्राजक्ता माळी हिला अनेक चाहत्यांचे फोन आल्याचे ती सांगते.

यामालिकेच्या पुनर्प्रक्षेपणाबद्दल बोलताना,प्राजक्ता माळी म्हणाली, “हिंदीमालिकेत काम करायचं असं मी मनाशी ठरवलं होतं. त्यामुळे ‘जुळूनयेति रेशीमगाठी’ही मालिका न स्वीकारण्याचा निर्णय मी घेणार होते. मात्र, ‘झी’सोबतकाम करायचं असल्याने, या मालिकेत काम करायची संधी सोडू नये असं मला आईने सांगितलं.

आज मागे वाकून पाहताना मी स्वतःला भाग्यवान समजते. अर्थात, या मालिकेत मी काम केलेलं नसतं, तरीही ती माझी सगळ्यात आवडती मालिका असती. ही एक उत्कृष्ट मालिका आहे. सध्याच्या काळात, ही मालिका पुन्हा पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्वच चाहते खुश आहेत. एक सकारात्मक संदेश, वेगळा विषय आणि मन प्रसन्न करणारी ही मालिका सगळेजण पुन्हा एकदा पाहतील, याची खात्री आहे.”