राजकीय पार्श्वभूमीवर संजय दत्तचा नवा चित्रपट, ट्रेलर झाला लॉन्च !

0

सध्याचं राजकारण हे खूप चर्चात्मक ठरत आहे. या राजकारणाला नेमकं कोणतं नाव द्यावं असं सगळयांना वाटू राहिलं आहे. राजकारणाचा वापर करून मोठी लोकं गोरगरीब यांचा वापर करून घेऊ लागले आहेत. राजकारणात काय घडतं !..कसं घडतं…हे सर्व चित्रपट माध्यमाद्वारे सरकार या गाजलेल्या चित्रपट मधून दाखवण्यात आलेलं आहे. पण संजू बाबा नवीन राजकारणावर आधारित चित्रपट घेऊन येतोय हे प्रेक्षकांना कळताच चाहत्यांचा आंनद गगगणात मावत नाही आहे.

पुण्याच्या येरवाड्या जेल मध्ये मुंबई बॉम्बस्फोट हल्या प्रकरणात संजू बाबा अडकला होता. दोन वर्षांपूर्वी तो जेव्हा सुटला तेव्हा त्याच्या आयुष्यात आधारित संजू नावाचा चित्रपट आला होता. आता प्रस्थानम या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या चित्रपट मध्ये संजू बाबा प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत.

‘हक दोगे तो रामयाण शुरू होगी, और छिनोगे तो महाभारत…’ असं म्हणत संजू बाबाच्या ‘प्रस्थानम’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा राजकारना भोवती फिरताना दिसत आहे. त्यामध्ये आपल्या हक्कांच्या मागणीवर लढताना दिसत आहेत. चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

होम प्रॉडक्शनच्या खाली साकारण्यात आलेल्या ‘प्रस्थानम’ चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची मेजवाणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात संजय दत्त शिवाय अभिनेता जॅकी श्रॉफ, मनीषा कोयराला, चंकी पांडे आणि अली फजल हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुन्नाभाई ,लगे रहो मुन्नाभाई ,वास्तव अश्या अनेक वेगवेगळ्या चित्रपटामधून संजू बाबा ने वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. आव्हानात्मक भूमिका स्वीकारून त्यात जीव ओतून काम करून ती गाजवलेली आहे. येणाऱ्या नवीन चित्रपट मध्येही त्यांची भूमिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!