Loading...

प्रियंका चोप्राचा नवीन घराची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

निक जोनस आणि प्रियांका चोप्रा ही जोडी बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही कायम चर्चेत असते. निक आणि प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत… कारण या दोघांनी मिळून नवं घर घेतल्याची बातमी आहे. या जोडप्याने लॉस एंजलिसच्या सॅन फर्नेंडो व्हॅलीमध्ये नवं मॅन्शन विकत घेतलं आहे. याची किंमत 20 मिलियन डॉलर्स म्हणजे 144 कोटी रुपये आहेत.

याआधी त्यांनी बेवर्ली हिल्समधील घर विकल्याचं वृत्त होतं. एनचीनो परिसरातील हे मॅन्शन तब्बल 20,000 चौरस फूट आहे. या घरात सात बेडरुम्स आणि 11 बाथरुम आहे. यात स्विमिंग पूलही आहे. तर घरासमोर व्हॅलीचा सौंदर्य न्याहाळता येतं.

Loading...

प्रियांका आणि निक यांनी याआधी त्यांनी बेवर्ली हिल्स भागात घर घेतलं होतं. पण हे घर घर विकल्याची चर्चा होती. त्यांनतर हाती आलेल्या माहितीनुसार या दोघांनी लॉस एंजलिसमधील सॅन फनांडो व्हॅलीमध्ये नवा मॅन्शन घेतला आहे. त्यांच्या या नव्या घराची किंमत २० मिलियन डॉलर्स, म्हणजे साधारण १४४ कोटी रुपये सांगितले जात आहे.

काय आहे खास?

याशिवाय घरात एन्टरटेन्मेंटसाठी बोलिंग एले, मूव्ही थिएटर, रेस्टॉरन्ट क्वॉलिटी वेट बार, इनडोर बास्केटबॉल कोर्ट, लाऊंज एरिया/गेम्स रुम आहे, तिथे पूल टेबल आणि पाहुण्यांसाठी छोटी जागा आहे. सोबतच वेगळा जिम एरिया आहे.

देसी गर्ल प्रियांका आणि निक यांचं हे घर २० हजार स्क्वेअर फुटांचं असून, ७ बेडरूम आहेत. घरामध्ये स्वीमिंग पूलही आहे. फनांडो व्हॅलीचं सुंदर दृश्य या घरातून दिसतं. याशिवाय घरामध्ये बॉलिंग ऑले, थिएटर, बास्केटबॉल कोर्ट, लाउंज एरिया,जिम आदी सुविधाही आहेत. या घराजवळ निकचा थोरला भाऊ जो जोन्सचं घर आहे.

6.9 मिलियनमध्ये जुनं घर विकलं

निक जोनासने आधीचं घर 6.5 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी होतं आणि 6.9 मिलियन डॉलर्समध्ये त्याची विक्री केली होती. निकने हे घर 2018 मध्ये खरेदी केलं होतं. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. जोधपूरच्या महलात दोघे विवाहबंधनात अडकले होते. निक अमेरिकेतील प्रसिद्ध पॉपस्टार आहे.

Loading...

प्रियांका चोप्रा कामासाठी जरी भारतात येत असली तरी परदेशात ती चांगली रूळली आहे. तिच्या सासरच्या मंडळींसोबत आनंदाचे क्षण घालवताना प्रियांका बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडेच तिनं सासरच्या लोकांसोबत साजरा केलेल्या पहिल्या दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. ‘निकयांका’चं लग्न मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालं होतं. दोघंही वेगवेगळ्या संस्कृतीत वाढले असले तरी ते एकमेकांचे सण आवर्जून साजरे करतात.

काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने आपली करवाचौथ साजरी केली होती. त्यावेळी निकही खूप उत्साहात दिसत होता. दिवाळसणाच्या निमित्ताने प्रियांकाचा एथनिक अवतार दिसला. गोल्डन फ्लोरल साडीत ती खूप सुंदर दिसत होती.

क्वॉन्टिको वेब सीरिजच्या माध्यमातून तिने हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून व्हाईट टायगर चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने ती दिल्लीत आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.