ताजी बातमी: जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी मारून केलीय भारतीय जवानांनी बदल्याची सुरुवात !

0

अहो, वेळ आली आहे यांना धडा शिवायची आता सर्जिकल स्ट्राईक २ पाहिजे रक्ताचा बदला रक्स्तानेच घेतल्या जाईल असे एक न अनेक आक्रोशजनक वक्तव्य प्रसार माध्यमांच्या द्वारे आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत आहे आणि त्यामागे तसं कारणही आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा इथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात आपल्या सीआरपीएफच्या ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले.

आता एक आत्मघाती हल्ला होता आणि भ्याड हल्ला होता; म्हणून भारतीय जनतेत आता फक्त या हल्ल्याच्या बदल्याची भावना निर्माण झाली आहे. ताज्या मिळालेल्या माहिती नुसार, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी, सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास (८ वाजून ४५ मिनिटे) पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचे चोख उत्तर सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांना दिले आहे.

लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो जैश-ए-मोहम्मद तेच संगठन आहे ज्याने सीआरपीएफ वर हा आताघाती हल्ला करविला. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशत वाद्यांपैकी एकाचे नाव गाजी रशीद आहे.

सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्याच याचा मोठा सहभाग होता पण या बद्दलची माहिती अधिकृतरित्या अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पिंगलान येथे भारतीय सेनेचे जवान आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशत वाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. काल रात्री सुद्धा याच चकमकीत ४ जवानांना वीरगती प्राप्त झाली.

त्यात एक आर्मीचे मेजर होते. पुलवामा येथे हल्ला घडवून आणण्यासाठी मागच्या महिन्यात जैश-ए-मोहम्मदचे १५ दहशतवादी भारतात घुसले. या घुसखोरांमध्ये कामरानचा देखील समावेश होता. हल्ल्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण द्यायला त्याने आपल्या सोबत अनेक उपकरणे आणि ज्वलंत स्फोटके सुद्धा आणली होती.

कोण आहे हा दहशतवादी गाजी रशीद: गाजी रशीद, २८ वर्षांचा हा दहशतवादी नुकता २ महिन्यापूर्वीच कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. याच रशीदने अफगाणी युद्धात सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडली आहे. आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानच्या एका विशिष्ट सैन्य टोळीने त्याला प्रशिक्षण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तुम्हाला माहिती आहे थोडंसं काश्मीर हे पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि त्याच पाक व्याप्त काश्मीरमधील घडणाऱ्या घटनांवर आणि प्रक्रियांवर एक विशेष टोळी पाळत ठेवते. त्यांनीच या रशीद ला प्रशिक्षण दिलं असावं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिदने पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमा भागातील एका युद्धात सहभाग घेतला होता.

अफगाणिस्तानमध्ये मुजाहिद्दीन असलेल्या गाजी राशिद हा एक कुख्यात आयईडी एक्सपर्ट होता. राशिद, त्याच्या दोन साथीदारांसोबत घुसखोरी तो डिसेंबर २०१८मध्ये भारतात भारतात शिरला आणि त्यानंतर ते दक्षिण काश्मीरमध्येच लपले होते. पुलवामा हे ठिकाण सुद्धा दक्षिण काश्मीर मध्येच आहे जिथे हल्ला झालाय.

पाकिस्तानचे दहशतवादी संगठन जैश-ए-मोहम्मदने त्यांच्या कुख्यात कमांडर रशीदला काश्मीरवर हल्ला करण्याचे आदेश दिले; अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. तिथे हल्ला करताना काश्मीर मधील एका स्थानिक युवकाचा वापर करावा असंही सांगण्यात आलं आणि मग या हल्ल्यासाठी आदिल अहमद दार याची निवड करण्यात आली.

गेल्या वर्षभरात दहशतवादाच्या मार्गावर केलेल्या अनेक युवकांना ऑपरेशन ऑलआउटमध्ये ठार मारण्यात आले आहे. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये समाविष्ट आहेत जैशचा कमांडर मसूद अजहरच्या बहिणीचा मुलगा तल्हा आणि भावाचा मुलगा उस्मान. या दोघांना भारतीय लष्कराने दक्षिण काश्मीरमध्येच कंठस्नान घातले.

पाकिस्तानी नागरिक कामरान: पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याची योजना ही पाकिस्तानी नागरिक कामरानचीच होती. कामरान जैशचा सदस्य आहे. तो दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल या परिसरात खूप सक्रीय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!