रहस्यमयी मृत्यू ने गाठलेल्या ‘स्वदेशी’ चे ब्रँड अंबॅसेडर, राजीव दीक्षितजीं बद्दलच्या ह्या गोष्टी माहीत आहेत का..?

0

हिंदुस्थानात गांधीजींच्या नंतर ‘स्वदेशी’ चे खंदे पुरस्कर्ते असलेले राजीव दीक्षित ह्यांच्या बद्दल आपल्याला तेव्हाच कळले जेव्हा ३० नोव्हेम्बर २०१० साली छत्तीसगडच्या भिलई गावात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू खूप रहस्यमयी होता. त्यांचे शरीर निळे पडले होते, जणू त्यांच्यावर विषप्रयोग झाला असावा. पण तरीही त्यांचे पोस्टमार्टम झाले नाही. त्यांना त्यांच्या घरी म्हणजे सेवाग्राम मध्ये न्यायच्या ऐवजी हरिद्वारला पतंजली मध्ये घेऊन जाण्यात आले होते. ह्या बद्दल कोणालाच कसली कल्पना नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यू ला कायम गूढ मृत्यू असेच मानले गेले आहे. चला तर आज त्यांच्या विषयी अजून काही तथ्ये पाहुयात.

१. राजीव दीक्षित ह्यांची जन्म आणि मृत्यू ची ‘तारीख’ सारखीच आहे. त्यांचा जन्म ३० नोव्हेम्बर १९६७ साली उत्तरप्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राध्येशाम तर आईचे नाव मिथिलेशकुमारी होते.

 

२. राजीव दीक्षित ह्यांनी आय आय टी मधून एम टेक ही पदवी घेतलेली आहे. इतकेच नाही तर त्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांच्या सोबतही काही वर्षे काम केले आहे.

३. राजीवजी लहानपणी महिन्याला ८०० रुपयांपर्यंत फक्त पुस्तके आणि वर्तमानपत्र घेऊन वाचन करत असत. लहानपणापासून त्यांना देशात काय घडतंय आणि आपण काय करू शकतो ह्याबद्दल आस्था होती.

४. ते ‘स्वदेशी’ चे खंदे प्रचारक आणि प्रसारक होते. त्यांच्या मनात सतत भारतामध्ये सगळे स्वदेशी कसे बनेल आणि विकले जाईल ह्या बद्दलच विचारचक्र चालू असे. त्यांचा वैश्विकरणावर विश्वास नव्हता. सगळ्या विदेशी कंपन्यांना भारतातून पळवून लावणे हे त्यांचे ध्येय होते.

५. त्यांचा आयुर्वेदावर खूप विश्वास होता. स्वतःव्हे रोग ते स्वतःच आयुर्वेदाच्या मदतीने बरे करत. सर्दी झाल्यास अंगठ्याच्या मेथी दाणे चिकटवून बरे होत. आयुर्वेद आणि ऍक्यु प्रेशर ह्याची त्यांना खूप माहिती होती. भारतात देखील ‘मेडिकल’ क्षेत्र हे फक्त अगुर्वेदाशी निगडित असावे अशी त्यांची इच्छा होती.

६. शिक्षणसंबंधी सुद्धा भारतात बदल घडावेत अशी त्यांची खूप इच्छा होती. मेकॉले चे देणे हद्दपार करून पूर्वी सारखी गुरुकुल पद्धत भारतात सुरू व्हावी ह्या मताचे ते होते.

७. भारतभरात फिरून त्यांनी स्वद्देशीचा प्रचार तर केलाच पण आपल्या आयुष्यात १३ हजार पेक्षा जास्ती व्याख्यानं देखील दिली. आज सुद्धा तुम्ही त्यांची व्याख्यानं यु ट्यूब वर पाहू शकता.

८. राजीव दीक्षितांच्या गुरू होते इतिहासकार आणि प्राध्यापक धर्मपालजी. धर्मापालांकडून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पुस्तके सुद्धा मिळाली होती.

९. दीक्षित जी जवाहरलाल नेहरूंना भारताचे शत्रू मानायचे. मात्र देशातील ममता बॅनर्जी, अमिताभ बच्चन, वाजपेयी जी, अशा मोठमोठ्या व्यक्तींशी त्यांची सलगी असायची.

१०. ब्रह्मचारी असलेल्या राजीव दीक्षितांच्या विचार अतिशय स्फोटक होते. भोपाळ गॅस ट्रॅजडी ही अमेरिकनांनी केली, जवाहरलाल नेहरू गायीचे  मास भक्षण करत असत, अमेरिकेने स्वतःच कोकणची दया मिळावी ह्या साठी स्वतःवर वर्ल्ड ट्रेंड चा हल्ला करवून घेतला होता. अशा प्रकारची त्यांची वक्तव्ये कायम विवादास्पद राहिली.

११. सन १९९९ पासून ते समविचारी रामदेव बाबांसोबत जोडले गेले. आणि भष्टाचार, काळ पैसे ह्या मुद्यांच्या विरोधात एकत्र काम करू लागले. त्यांनी २००९ मध्ये ‘ भारत स्वाभिमान आंदोलन’ ची उभारणी केली. ज्यात भारतातील बुद्धिमान आणि इमानदार लोकांनाच प्रवेशास मुभा होती. ह्या सगळयाना हाताशी धरून भारताला विश्वशक्ती बनवावी असे त्यांचे ध्येय होते. इतकेच नाही तर जनाधार बघून २०१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे स्वप्न देखील त्यांनी पाहिले होते.

१२. अशा निडर माणसाच्या मृत्यू नंतर मात्र मीडिया मात्र मूग गिळून गप्प राहिला. त्यांच्या गूढ मृत्यूची बातमी केली गेली नाही. फक्त आदरांजली वाहून हे प्रकरण दाबण्यात आले होते.

आजही जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी असलेल्या राजीव दीक्षितांच्या विचारधारा मानणारे त्यांचे अनुयायी कार्यरत आहेत. त्यांची आयुर्वेदाचे प्रेम आणि फायदे आजही त्यांचे फॉलोवर्स सगक्यांपर्यंत पोहचवता आहेत. ही माहिती तुम्हाला काशी वाटली.? आम्हाला कंमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका..

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!