योगगुरू बाबा रामदेव यांचे वडील जगतात सर्वसामान्य आयुष्य! जाणुन घ्या त्यांचं सगळं कुटूंब नेमकं करतं काय?

.

काही माणसं आपल्या कर्तुत्वाने जगाच्या नकाशावर येत असतात. त्यांचा अभ्यास त्यांचे कष्ट हीच त्यांची खरी ओळख असते. कितीतरी संघर्ष त्यांच्या वाटयाला आलेला असतो. अवहेलना ही सोसलेली असते. पण कधी थांबायचं नाव हे लोकं घेत नाहीत. म्हणून ते यशाच्या शिखरावर ओळखीला सर करून टाकतात. साऱ्या जगाला आपल्या योग साधनेतून आयुर्वेदिक रस्ता दाखवणाऱ्या एका मोठ्या पण साधं राहणीमान असणाऱ्या व्यक्तीबद्दल आज आपण माहिती जाणुन घेणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव आहे योगगुरू ‘बाबा रामदेव’. आज सारा भारत या योगगुरु ला ओळखत आहे. त्यांच्या पतंजली या प्रोडक्शन कंपनीच्या अनेक स्वदेशी वस्तू आज भारत वापरत आहे.

आज जगभरामध्ये बाबा रामदेव यांनी योग साधना आणि आयुर्वेदिक या दोन गोष्टींना पोहचवलेलं आहे. यासोबत त्यांनी आयुर्वेदिक स्वदेशी कंपनीतून भारतातच नव्हे तर जगभरात शाखा उघडल्या आहेत. तिथल्या लोकांनाही भारतीयासारखं त्यांनी आयुर्वेदिक चं महत्व पटवून दिलेलं आहे.

जगभरात आयुर्वेदिक क्रांती सध्याच्या काळात घडून आणण्यामध्ये बाबा रामदेव यांचाही मोलाचा हातभार आहे. त्यांनी पतंजलीचा बिझनेस खूप प्रसिद्ध ही केला आहे. बाबा रामदेव देशभर योग शिबीर करून लोकांना एकत्र करून त्यात पतंजली च्या ब्र्यांड ला प्रसिद्धी देत असतात. आज त्यांनी हा त्यांचा व्यवसाय एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला आहे.

तुम्हाला ऐकूण धक्का बसेल परंतु बाबा रामदेव यांनी पतंजली चा एका वर्षभराचा टर्न ओव्हर करोडो रुपयांमध्ये खूप कमी काळात नेऊन ठेवला आहे. आज त्यांचा एका वर्षाचा टर्न ओव्हर ८००० करोड इतका आहे. पतंजली जगातल्या अनेक नामवंत कंपन्याच्या लिस्ट मधील आघाडीची कंपनी आहे.

एवढा मोठा व्यवसाय असूनही बाबा रामदेव आणि त्यांचं कुटूंब खूप साधारणपणे जीवन जगत आहेत. बाबा रामदेव यांच्या वडिलांचं नाव रामनिवास यादव आहे. त्यांचं कुटूंब हे पूर्वीपासूनच साधारण जीवन जगत आहे. कारण बाबा रामदेव लहान होते तेव्हा त्यांची परिस्थिती खूप बिकट होती.

आता जरी पैसा, नाव आणि इतर सगळ्या गोष्टी जीवनात आल्या असल्या तरीही जमीन सोडायची नाही हे रामदेव बाबा यांच्या कुटुंबाचं तत्व आहे. बाबा रामदेव यांचे वडील आजही शेती करतात. मुलगा जगभरात जाऊन पोहचला तरी ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

बाबा रामदेव यांच्या वडिलांना पाहून कुणाला वाटणार नाही की हे खरच त्यांचे वडील आहेत. कारण ते आज इतक्या साधारणपणे जगतात. बाबा रामदेव च्या आईचं नाव आहे गुलाबो देवी. बाबा रामदेव यांचा जन्म हरियाना मधील महेंद्र गड या ठिकाणी झाला. नऊ वर्षाचे असताना खानपूर च्या एका गुरुकुलात बाबा रामदेव शिकायला गेले. तिथे त्यांनी संस्कृत आणि योग साधनेची शिक्षा घेतली.

बाबा रामदेव यांना दोन भाऊ आणि एक बहिण. बहिणीच शेजारच्या गावात लग्न झालेलं आहे. इतर दोन्ही भाऊ गावात शेती करतात. बाबा रामदेव यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. कारण त्यांनी सन्यास घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी देशात वाढत चाललेल्या करोना रोगावर औषध काढलेचा दावा त्यांनी केलेला आहे. कोरोनील नावाच्या औषधाची ६०० रुपये किमंत आहे. त्यावर नंतर सरकारने मात्र बांधी आणली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.