Loading...

रामशेज किल्याचा दैदिप्यमान इतिहास तुम्हाला माहित आहे का?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

या एकाच किल्ल्यामुळे औरंझेब आणि मुघलांना कळून चुकले की सर्व भारत एक बाजूला आन महाराष्ट्र एक बाजूला…समुद्र सपाटीवर 975 मीटर हा छोटा किल्ला वर ना धातूच्या तोफा पण नव्हत्या.छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. आपल्या लाडक्या मुलाचा अकबर चा पाठलाग करत औरंगझेब जेंव्हा महाराष्ट्रात घुसला.घुसला.

तेंव्हा त्याची नजर पडली ती रामशेज वर. औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्‍ट्राच्‍या स्‍वारीवर पाठवले. औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रामशेजच्‍या संरक्षणासाठी साल्हेर किल्‍ल्‍याचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला.

Loading...

ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. औरंगजेबाच्‍या आज्ञेनुसार शहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला. त्याच्यासोबत दहा हजारांची फौज होती आणि अफाट दारूगोळा आणि तोफा होत्या.

त्‍यावेळी रामशेज किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते. ते मुळचे मावळातील, धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी. सूर्याची जेधे रामशेजच्या तटावरून फिरत असायचे, दिवसा आणि रात्री. ते झोपायचे कधी हेच कोणाला माहीत नव्हते. शहाबुद्दीनन खानाने चार-पाच तासांत किल्‍ला ताबयात घेऊ या विचाराने किल्‍ल्‍यावर नाना त-हेने हल्‍ला केला.

किल्‍ल्‍याभोवतीचा वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. मात्र किल्‍ला त्‍याच्‍या ताब्‍यात येईना. रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या. पण संभाजीराजांनी प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या.

मराठ्यांनी किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला. त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला. पाच महिने झाले, त्याला किल्ला काही जिंकता येईना. मोगलांचे तोफगाळे किल्ल्यावर पोचत नव्हते. तेव्हा मोगलांनी जंगलातील झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा बुरूज बनवला आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला.

त्यावरून ते किल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्‍याचा परिणाम झाला नाही. घनघोर युद्ध चालू होते. दोन वर्षे झाली, मात्र रामशेज किल्ला अजिंक्य राहिला. त्‍यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलावून ती मोहीम फत्तेहखानकडे सोपवली. फत्तेखानने रामशेजवर आक्रमण चढवले. तरीही मराठे काही माघार घेईनात.

मोगल किल्ल्यावर आले, की किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोफणीतून दगड सुटायचे. दगड इतके जोरात सुटायचे, की काही मोगल जाग्यावरच ठार व्हायचे. फत्तेहखानला मावळे तसूभरही पुढे सरकू देईनात.  इतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईना. फत्तेहखानाचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोचायचा आणि त्यामुळे किल्ल्याची तटबंदी किंवा बुरूज ढासळायचा.

ते पाहून तो खुश व्हायचा. पण सकाळ झाली की तो बुरूज परत बांधून झालेला असायचा! ते पाहून फत्तेहखान आश्चर्यचकित व्हायचा. अनेक महिने सरले, हजारो मोगल मारले गेले, दारूगोळा वाया गेला.

औरंगजेबाने फत्तेहखानला परत बोलावले आणि कासमखानला स्वारीवर पाठवले. कासमखानने कडेकोट पहारा ठेवला. किल्ल्यावर दारूगोळा आणि अन्नधान्य पोचण्यासाठी वाट ठेवली नाही. किल्ल्यापासून काही कोसावर रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते, पण त्यांना रसद पोचवता येत नव्हती.

Loading...

गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले, अन्नावाचून हाल होऊ लागले. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला आला, जोराचा पाऊस पडला, तो सलग दोन दिवस पडत होता. किल्ल्याच्या बाजूला मेलेल्या जनावरांची दुर्गंधी सुटली. मोगल सैनिकांना पहारा देणे अशक्य झाले. मग कासमखानने पहारा सैल केला. तो दिवस सरला, रात्र झाली.

रात्रही सरली, नंतर पहारे पुर्ववत करण्यात आले. कासमखानच्या लक्षात आले, की मावळे ताजेतवाने दिसत आहेत. कासमखानला त्याची चूक लक्षात आली. त्या दोन दिवसांच्या सैल पहा-यात मावळे गडावर पोचले होते! रूपजी आणि मानाजी यांनी अन्नधान्य, दारूगोळा गडावर पोचवला होता. कासमखानला कळून चुकले, की रामशेज काबीज करणे हे स्वप्नच राहणार आहे. कासमखानही किल्ला जिंकू शकला नाही. किल्ला सहा वर्षें झुंजत होता!

एक आख्यायिका पण प्रसिद्ध आहे

तिथे रामशेजवर काही भुते आहे असं एक मुघल सारदारला सांगितले तेंव्हा त्यांनी मांत्रिक बोलावलं त्याने 100 तोळा चा नाग बनवला….आणि जर्नव हा मांत्रिक गडावर चालला ट्रँव वरून एक गोफनी मधून दगड आला नि मंत्रीकच्या डोक्यावर पडला.सारे मुघल तिथून पळाले.

त्या नंतर संभाजी महाराजांनी किल्लेदार ला बोलावून त्याचा सत्कार केला.

जेधे शकावली मधील रामशेज चा उल्लेख…त्रंबक वरून मदत केली असल्याचा दाखला.

Credit:
Photo by Nisarg Premi निसर्ग प्रेमी
Article by Ashish Mali

starmarathi.me वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. starmarathi.me त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.
Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.