‘भल्लाल देव’ म्हणजेच अभिनेता ‘राणा दुग्गबाती’ अडकणार विवाहबंधनात.पहा कोण आहे ती सुंदरी

बाहुबली व बाहुबली 2’ या दोन्ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटातील “भल्लाल देव” अर्थात राणा दुग्गबाती याबद्दल एक नुकतीच खबर कानी पडली आहे. बाहुबली फेम राणा दुग्गबाती याने आजवर अनेक उत्कृष्ट सिनेमांमधून स्वत:च कौशल्य लोकांसमोर ठेवलं आहे. पहायला गेलं तर दाक्षिणात्य सिनेमा रूद्रमादेवी यात राणा दुग्गबातीची भुमिका फार उत्तम पहायला मिळते.

यांशिवाय बाॅलिवूडमधील ये जवानी है दिवानी, बेबी, नुकताच येऊन गेलेला हाऊसफुल 4 यां सिनेमांमधूनही त्याने आपल्या अभिनयातील खुबी प्रेक्षकांसमोर ठेवली आहे. सध्या राणा दुग्गबाती दोन गोष्टींमुळे अधिक चर्चेत आहे, एक म्हणजे “मदाई थिरंथू” ही त्याची पुढील येणारी तेलुगू फिल्म असणारं आहे; जिची क्रेझ अनेकांमधे पसरलेलीच आहे. याशिवाय महत्वाची दुसरी खबर म्हणालं तर ती त्याच्या होणाऱ्या जिवणसंगिनीबद्दलची आहे. अर्थात राणा दुग्गबाती हा आता विवाहबंधनात लवकरचं अडकणार आहे. आणि याबाबतीत माहितीसुद्धा त्यानेच त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

View this post on Instagram

And she said Yes 🙂 ❤️#MiheekaBajaj

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

दाक्षिणात्य अनेक चित्रपटांमधून काम करणारा राणा खऱ्या अर्थाने “बाहुबली” नंतर अधिक प्रसिद्धीस आला. अगदी त्याने रणबीर दिपीकाच्या येऊन गेलेल्या ये जवानी है दिवानी मधेही भुमिका साकारलेली पण ते सहसा अनेकांना आठवणार नाही, परंतु ते काही असो. राणाने सध्या इंस्टाग्रामवर एका मुलीसोबत फोटो शेअर करत तिने लग्नाला होकार दिल्याची बातमी सर्वांना कळवली आहे. “मिहीका बजाज” हे त्या मुलीचं नाव आहे.

प्रोफेशनली ती एक इंटेरियर डिझाईनर आहे. तशी राणा दुग्गबातीची फॅन फाॅलोविंग नेहमीच त्याच्याशी अटॅचड् राहीली आहे. आणि त्याच्याबद्दल येणाऱ्या नवनवीन गोष्टींकडे त्याच्या चाहत्यांच लक्ष असतं. राणाची होणारी पत्नी ही एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीन आहे सोबतच ड्यू ड्राॅप डिझाईन स्टुडीओही तिचाच आहे.

राणा दुग्गबाती याने जेव्हा ही गुडन्यूज अर्थात गोड बातमी दिली तेव्हा, ३ लाख ४० हजारांहून अधिक लोकांनी केवळ एका तासाभरात लाईक्सचा पाऊस पाडला. बाहुबली सिनेमातील त्याची फीटनेस पाहून अनेकजण त्यावर फिदा झाले होते. अनेकांनी तर त्याला स्वत:चा आयडीयलही बनवून घेतलं. पिळदार शरीर आणि दमदार व्यक्तिमत्त्व असल्यास हमखास तो व्यक्ती समोरच्यावर छाप पाडणारं, हे निश्चित. आता राणासाठी अनेक गोष्टी खास असणार आहेत; त्यात लग्न आणि पुढे येणारे सिनेमे.

 

Free Download Bollywood Movie

Web Series Free Download