रणबीर आलियाच होणार शुभमंगल !

0

आलिया भट आणि रणवीर कपूर खूप दिवसांपासून सोबत असतात तर त्या दोघांच्या जोडीची चर्चा देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असते. बॉलीवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून त्यांची ओळख आहे. आलीया आणि रणवीर लवकरच लग्न करणार आहेत अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर कानावर येत आहे. सध्याच्या चर्चेत असे ऐकायला मिळाले आहे की 2020 च्या शेवटी दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात.

ते दोघे लग्न करून सुखाने संसार करणार अश्या अनेक बाबी लोकांच्या चर्चेतुन दिसून येत आहे. आलिया ही सध्याची खूप आघाडीची अभिनेत्री आहे. तिची प्रत्येक भूमिका ही तिने खूप विचारपूर्वक केलेली असते. राझी आणि गली बॉय मध्ये तर तिनं खूप हटके काम केलं आहे. रणबीर कपूर हा तर बॉलिवूड चा चॉकलेट बॉय मानला जातो. त्याने केलेल्या आत्ता पर्यंत च्या सर्व फिल्म रोल हे खूप वेगळ्या प्रकारचे आहेत.

बर्फी , रॉकस्टार किंवा असे अनेक चित्रपट त्याचे गाजलेले आहेत. आलिया आणि रणबीर हे लवरकच एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांना साथ अशी चर्चा सर्वत्र उठली आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने जुहूच्या आसपास कोटीची आलिशान घर खरेदी केली आहे. त्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चानी आणखी जोर धरला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारानुसार दोन्ही परिवाराने लग्नाची तयारी सुरू केली असून. लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाईन केलेले लहंगा परिधान करणार आहे.

आलीया आणि एप्रिल महिन्यातच सब्यासाची ची भेट घेतली होती या भेटीदरम्यान दोघांमध्ये वेडिंग लहंगा संदर्भात चर्चा झाली.सब्यासाचीने डिझाईन केलेले लेंहंगे अनुष्का शर्मा ,दीपिका पदुकोण ,आणि प्रियांका चोप्रा यांनी आपल्या लग्नात परिधान केले होते. सप्टेंबर महिन्यात ऋषी कपूर न्यूयॉर्क वरून मुंबईत परत येणार आहे. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची तारीख काढली जाईल अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

हे दोन कुटुंब नेमकं कधी बंधनात अडकतात यांकडे सगळयांनचच लक्ष लागलेलं आहे. कारण चाहते दोघांचे ही याकडे लक्ष ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!