रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात कशी दिसते पहा !

मंडळी मराठी वाहिन्यांवरील मालिका नेहमीच समाजप्रबोधनाचे प्रयोग करत असतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने तर सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण नेहमीच ऐकतो. हाच स्टार प्रवाह या वाहिनीवर हा वेगळा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने समाजा मधील अनिष्ट प्रकारावर भाष्य केलेलं आहे.

ही मालिका मराठी रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. आज आपण रेशमा शिंदेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्मा मेकअप करून एका सावळ्या तरुणीची भूमिका साकारत आहे.खऱ्या आयुष्यात मात्र रेश्मा फारच वेगळी दिसते.

रेश्माने याआधी लगोरी मैत्री रिटर्न्स, महाराष्ट्राचा सुपरस्टार अशा काही प्रसिद्ध मालिकांमध्ये देखील काम केलेल आहे. या भूमिकांमुळे आणि तिच्या अभिनय कौशल्यामुळे ते नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. मराठी सोबतच रेश्माने हिंदीतही काम केलंय.रेश्मानं ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

रेश्मा ख-या आयुष्यात मनमोकळ्या स्वभावाची आहे. रेश्माचा आवडता अभिनेता आणि आधीपासून क्रश असलेली व्यक्ती म्हणजे अक्षय कुमार.
‘लालबागची राणी’ या चित्रपटातून देखील तिने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे.खऱ्या आयुष्यातील दिपा सुंदर असून सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो पोस्ट करत असते.