Loading...

शेवंता आणि अण्णा नाईक यांच्यातील दुवा म्हणजे “चोंट्या”, आहे तरी कोण हा चोंट्या?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता आणि अण्णा नाईक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे “चोंट्या”. प्रमुख भूमिकेईतकीच चोंट्याची भूमिका देखील महत्वाची मानली जाते. आपल्या दमदार अभिनयाने ही भूमिका वाढवणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “हृदयनाथ जाधव”. चोंट्याची भूमिका हृदयनाथ साठी मोठा टर्निंग पॉईंट देणारा ठरली आहे असे म्हणायला हरकत नाही शेवंता आणि अण्णा नाईक यांच्यामुळे ही भूमिका रसिकांच्या स्मरणात राहणारी आहे.

सहजसुंदर अभिनयाने रंगवलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या देखील विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे.या कलाकाराविषयी अधिक जाणून घेऊयात…

Loading...

हृदयनाथ जाधव या कलाकाराने चेतनास हजारीमल सोमाणी कॉलेजमधून कॉमर्स विषयातून पदवीचे शिक्षण घेतले. रंगभूमीवरील मेरे पिया गये रंगून सारखी अनेक नाटके त्याने गाजवली आहेत. 

डॅडी, ईडक, नदी वाहते, अरुणोदय यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातुन त्याला अभिनयाची संधी मिळाली. एक व्हॉइस आर्टिस्ट म्हणून तो ओळखला जातो. 

मंचावर महात्मा फुले यांच्या “तृतीय रत्न” चे अभिवाचन करण्याची संधी त्याला मिळाली. गोवा फिल्म फेस्टिव्हल ,कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याने अभिनित केलेल्या “ईडक” चित्रपटाची निवड करण्यात आली होती.

Loading...

तर परदेशी चित्रपट महोत्सवात ‘अरुणोदय’ चित्रपटाने वाहवा मिळवली. या हरहुन्नरी कलाकाराला प्रेक्षकांनी स्मरणात ठेवले ते रात्रीस खेळ चाले मधील चोंट्याच्या भूमिकेमुळे. 

झी वहिनीच्या “उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०१९” साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका म्हणून नामांकन मिळाले आहे. प्रेक्षकांकडून त्यासाठी भरघोस मतांची आवश्यकता आहे. या नामांकनात हृदयनाथ जाधव” या कलाकाराला यश मिळो हीच सदीच्छा!!!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.