Loading...

सावधान! तुम्ही हि हेडफोन लावून गाणे ऐकता का? तर हे नक्की वाचा.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

माणसाला आधुनिक तंत्रज्ञानाने जसे फायदे दिले आहेत, तशाच आपोआप काही वाईट गोष्टीही मिळाल्या आहेत. सतत मोबाईलवर किंवा आयपॉडवर गाणी ऎकण्याचे प्रमाण अलिकडे खूप वाढल्याचे निदर्शनास येते. रस्त्यावर बाहेर कुठेही तुम्ही बघितले तर कित्येकजण कानात हेडफोन लावून गाणी ऎकत असतात नाहीतर, बोलत असतात. याचा फटका आता तरूणांना बसणार आहे. कारण, मोबाइल किंवा आयपॉड द्वारे गाणे ऎकणा-या तरूणांची श्रवणशक्ती धोक्यात आली आहे.

जगातील एक अब्ज तरुण-तरुणींच्या श्रवणशक्तीवर कानाला हेडफोन लावून जोरजोरात संगीत ऐकल्याने परिणाम झाला असल्याचा धक्कादायक निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे.

Loading...

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीत श्रीमंत देशांमधील सर्वसाधारण १२ ते ३५ या वयोगटातील तरुणांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने कानाच्या अत्यंत जवळून कर्णपटलांवर जोरजोरात आदळणाऱ्या संगीत लहरींनी बहिरेपणा येत असल्याचे स्पष्ट केले आहे. बहिरेपणाचा सामना स्मार्टफोन किंवा अन्य उपकरणांचा वापर करून संगीत ऐकणाऱ्या साठ टक्के लोकांना करावा लागतो; तर सुमारे ४० टक्के लोकांना नाइट क्लब आणि संगीताचे कार्यक्रम ऐकल्याने बहिरेपण येते.

जागतिक आरोग्य संघटनेचे शेली चढ्ढा याबाबत बोलताना म्हणाले, जोरदार आवाजात संगीत ऐकायला बहुसंख्य तरुण मुलांना आवडते. त्यांच्या श्रवणशक्तीवर हे ध्वनिप्रदूषण परिणाम करते आणि त्यांना श्रवणशक्ती गमवावी लागते. वुवुझेला नावाचे वाद्य साउथ आफ्रिकेत २०१० मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धांच्या वेळी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरण्यात आले होते.

नऊ सेकंद हे वाद्य वाजवल्यास सुमारे १२० डेसिबल्सचा आवाज निर्माण होत होता. श्रवणशक्तीवर या वाद्याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट आपण टाळू शकलो असतो ना? या तरुण मुलांनी लक्षात घ्यायला हवे, की एकदा गेली की श्रवणशक्ती पुन्हा येत नाही.

Loading...

त्याचबरोबर गर्दीच्या वेळी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणानेही बहिरेपणा येऊ शकतो. ८५ डेसिबल्सपर्यंत हे प्रदूषण पोहोचले आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. इयर प्लग्जसारखे उपकरण वापरायचे असेल, तर आवाज मर्यादित ठेवणे गरजेचे असल्याचेही चढ्ढा यांनी स्पष्ट केले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी STAR Marathi घेत नाही.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.