थेट शत्रूदेश पाकिस्तानात राहून हेरगिरी करणारे भारताचे हे खरे जेम्स बॉण्ड माहीत आहेत का..?

0

जेव्हा ‘देशासाठी काही पण’ करण्याची जबाबदारी येते तेव्हा सच्चा भारतीय मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, आपल्या जीवाची पर्वा न करता तो स्वतःला झोकून देतो. भारतासाठी हेरगिरी करणारे असे कित्येक हेर होते आणि आजही आहेत. जे हयात नाहीत, ते त्यांच्या कर्म आणि निष्ठेमुळे लोकांच्या मनात सैदैव राहिले आहेत. ह्यातील काही प्रभावशाली हेरांवर बॉलिवूड मध्ये सिनेमे देखील बनले आहेत. आज अशाच काही ‘अंडर कव्हर’ एजंट्स बद्दल जाणून घेऊयात, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि प्रसंगी जीवाची आहुती ही दिली.

१. मोहनलाल भास्कर:
पाकिस्तानाच्या धर्तीवर राहून भारतासाठी हेरगिरी करणारे एक निष्ठावंत हेर म्हणजे मोहनलाल भास्कर. त्यांनी स्वतः हेर असल्याची, आपल्या परिवाराला थोडीही खबर लागू दिली नाही. पाकिस्तानात जाऊन राहण्यासाठी पाकिस्तानी वाटणे गरजेचे होते म्हणून मोहनलाल ह्यांनी धर्म बदलून घेतला. मोहनलाल भास्करचे महंमद अस्लम झाले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी स्वतःचा खतना देखील करून घेतला आणि ते तडक पोचले पाकिस्तानला. त्यांना पाकिस्तानी परमाणू प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळवायच्या ‘मिशन’ वर पाठवण्यात आहे होते. मात्र त्यांच्या पाकिस्तानी सहाय्यकाने त्यांना धोका दिला. त्यांच्या बद्दल पाकिस्तानी सरकारला खबर देऊन टाकली. त्यामुळे पाकिस्तानी कोर्टाने मोहनलाल ह्यांना हेरगिरी करण्याच्या गुन्ह्याखाली १४ वर्षे करावास ठोठावला. तिथून परत भारतात आल्यानंतर आपल्या कामगिरी विषयक ‘ ऍन इंडियन स्पाय इन पाकिस्तान’ असे पुस्तकही त्यांनी लिहिले.

२. रवींद्र कौशिक:
फक्त २१ वर्षांचे रवींद्र कौशिक हे राजस्थानातील गंगानागर जिल्ह्याचे रहिवासी होते. ते स्वतः नाट्यकलाकार देखील होते. भारतीय रॉ अधिकाऱ्यांनी त्यांना एका मिशन साठी हेरले होते. १९७३ – ७४ अशी दोन वर्षे रवींद्रजींना पाकिस्तानी नागरिक वाटण्याकर्ता प्रशिक्षण दिले गेले. त्यात उर्दू भाषा, इस्लामी ग्रंथ, पाकिस्तानी भूभागाचा अभ्यास आशा सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी शिकवल्या गेल्या. १९७५ साली २३ वर्षांचे रवींद्र कौशिक भारतीय हेर बनून पाकिस्तानात पोचले. तिथे अहमद शकिर हे नाव घेऊन त्यांनी कराची विश्वविद्यालयात वकिली शिकण्यासाठी विद्यार्थी म्हणून नाव नोंदवले.

वकिलीची पदवी घेतल्यावर कमिशन अधिकारी म्हणून ते पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले. पुढे त्यांचे उत्तम काम पाहून त्यांना मेजरचे पद मिळाले. अमानत नावाच्या मुलीशी लग्न करून संसार थाटला. त्यांना एक मुलगाही होता. ते इतके पाकिस्तानी संस्कृतीशी समरस झाले की हेर म्हणून ओळखू ही येणार नाहीत. १९७९ ते १९८३ पर्यंत त्यांनी भारताला खूप महत्वाच्या खबरी पोहचवल्या. मात्र रॉ नी पाठवलेल्या दुसऱ्या नवख्या एजंट ला भेटण्याच्या नादात त्यांचे पितळ पाकिस्तानपुढे उघडे पडले. १९८५ साली त्यांना तुरुंगात पाठवले गेले. पुढे १६ वर्षे ते तिथेच अडकले. २००१ साली टीबी आणि हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झाला. भारताने त्यांच्या साहसाचा गौरव त्यांना ‘ब्लॅक टायगर’ ही उपाधी देऊन केला.

३. कश्मीर सिंग:
काश्मीर सिंगांनी ३५ वर्षे पाकिस्तानी तुरुंगात काढली पण कधीच स्वतः भारतीय हेर आल्याची कबुली दिली नाही. भारतीय सेनेत काम करत असताना त्यांना पाकिस्तानी युद्धनीती आखणाऱ्या स्थळांची माहिती काढण्यासाठी पाठवण्यात आले होते. पाकिस्तानात राहून, बस मध्ये फिरून त्यांनी एके काम चोख बजावले. मात्र तरीही ते पकडले गेले आणि ३५ वर्षे तुरुंगात अडकले.

४. अजित डोभाल:
उरी सर्जिकल स्ट्राईक चे मास्टर माईंड आणि सध्याचे भारतीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोभाल सगळ्यांनाच माहीत आहेत. पण स्वतः हेर बनून ७ वर्षे पाकिस्तानात राहून भारताला उपयुक्त माहिती त्यांनी पुरवली हे कोणाला माहिती नसेल. त्यानंतर ते ६ वर्षे इस्लामाबाद मध्ये भारतीय एम्बसी मध्ये कामाला होते. ऑपरेशन ब्लॅक थंडर, उरी सर्जिकल स्ट्राईक, कंदहार अटॅक अशा आणखी कित्येक ऑपरेशन्स मध्ये त्यांचा सहभाग होता.

५. सरस्वती राजमणी:
हेरगिरी मध्ये भारतीय पुरुषच नाहीत तर महिला देखील जीवावर उदार होऊन सहभागी झालेल्या आहेत सरस्वती राजमणी हे त्याचेच उदाहरण. १९४२ साली नेताजींच्या सेनेत सहभागी झालेल्या सरस्वती वयाच्या १६ व्या वर्षांपासून सैन्याच्या हेर खात्यात कार्यरत होत्या. स्वतःवर गोक्या झेलून स्वतःच्या एक साथीदाराला ब्रिटिश कॅम्प मधून सोडवून आणण्यात त्यांची धडाडी दिसून आली होती.

६. सहमत खान:
भारताची आणखीन एक हेर सुपुत्री म्हणजे सहमत खान. हल्लीचे कश्मिरी युवा , भारतीय सैन्यावरच हल्लाबोल करण्यात मग्न थेट शत्रूदेश पाकिस्तानात राहून हेरगिरी करणारे हेअसताना ही काश्मिरी मुलगी मात्र स्वतःची मातृभूमी असलेल्या भारत देशासाठी काहीही करण्यास उत्सुक होती. हेरगिरीचे प्रशिक्षण घेऊन, पाकिस्तानी आर्मी ऑफिसरशी लग्न करून ती पाकिस्तानात गेली आणि पाकिस्तानी सेनेची गुप्त माहिती ती भारताला पाठवत राहिली. ती सुखरूप पणे भारतात परतलीही मात्र तिचे जीवन पूर्वी सारखे राहिले नाही. तिच्या ह्या धडसाला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिच्यावर राझी नामक सिनेमाही निघाला होता.

देशभक्ती, बहादुरी आणि त्यागाची मूर्ती ठरलेले हे हेर म्हणजे भारताची शान आहेत. त्यांच्या ह्या साहसी कार्याला स्टार मराठीचा सलाम..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!