सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ पाहुन भावुक झाली गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती!

स्वर्गीय झालेल्या सुपरस्टार सुशांतसिंग राजपूत चा नुकताच शेवटचा दिल बेचारा हा चित्रपट रिलीज झाला. तो चित्रपट प्रेक्षकांना खुप आवडत आहे. अनेक चाहत्यांना चित्रपट पाहुन अश्रू अनावर होत नाहीत. खरचं सुशांत एक हरहुन्नरी अभिनेता होता. एक हिरा होता. आकाशातला तारा होता. पण त्याची गर्लफ्रेंड ही तो चित्रपट पाहिल्यावर खुप भावुक झाली. तिने नेमकी कोणती भावुक प्रतिक्रिया दिली आपण पाहुयात. त्याआधी जाणुन घेऊयात त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी.

सुशांतसिंह राजपूत या हरहुन्नरी सुपरस्टार अभिनेत्याला निरोप देऊन महिना उलटून गेलाय. तरीही त्याच्या परी असलेलं प्रेम मात्र अनेकांचं कमी होताना दिसत नाही. याचाच अर्थ विसरण्याचा प्रयत्न जरी करून पाहिला तरी सुशांत मनातून उतरत नाही. काल २४ जुलै हा दिवस तर सुशांत च्या चाहत्यांसाठी खूप महत्वाचा होता. कारण त्याचा शेवटचा चित्रपट “दिल बेचारा” रिलीज झाला.

चित्रपटाने ओटीटी वरचे सगळे रेकॉर्ड्स एकाच दिवशी मोडून काढले आहेत. त्याच्या जाण्याने साऱ्या देशावर दुखांचा मोठा डोंगर कोसळला आहे; पण त्यात एक मुलगी अशी आहे की ती सुशांतचं पहिलंवाहिलं प्रेम होतं. एक महिन्यानंतर सुद्धा तिला सुशांत या जगात नाहीये याचा विश्वास बसत नाही.

तिचं नाव आहे अंकिता लोखंडे. अंकिता – सुशांत ‘ पवित्र रिश्ता ’ या टीव्ही सिरीयल मुळे एकत्र आली. त्यांची मानव अंकिताची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. दोघेही घराघरात पोहचले. दरम्यानच्या काळात मालिकेसारखं खऱ्या आयुष्यावर ही प्रेम बसलं.

ते त्यांनी खुलेपणाने स्वीकारलं सुद्धा. पण सुशांत ला मोठ्या पडद्यावर काम करायचं असल्याने त्याने सिरीयल सोडली. त्यानंतर त्याने काय पोचे हा पहिला चित्रपट करून आपलं नाव झळकवलं. पुढे २०१६ पर्यंत दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली. लग्न करायचं मिडियात जाहीर करून सुद्धा काही कारणामुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

पुढे दोघेही आपापल्या वाटेवर निघाली. सुशांत त्याच्या अभिनयाच्या जोरावर एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन सुपरस्टार झाला. तरीही दोघे एकमेकांना कधीच विसरू शकले नाही. पुढे सुशांत रिया चक्रवर्ती या अभिनेत्री च्या प्रेमात पडला. असं सांगितलं जातं की रिया मुळेच अंकिता आणि सुशांतसिंग यांचं ब्रेकअप झालं होतं. सुशांत गेल्याने साऱ्या बॉलिवूड वरचं शोककळा पसरली आहे. पण अश्यात त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रियाला ही मोठा धक्का बसला आहे.

” रिया चक्रवर्ती यांनी लिहिलय की हा चित्रपट आपल्याला पाहण्यास अधिक सामर्थ्य देईल. कारण सुशांत तू जरी शरीराने सोबत नसला तरी मनाने सोबत आहेस. मला माहित आहे की तू नसलास तरीही माझ्याबरोबर आहेस, मी तुला जीवनाच्या शेवटपर्यंत प्रेम करत राहील. आणि तुझ्या प्रेमाचा सतत आनंद घेत राहीन. रियाने लिहिले, की सुशांत तू माझ्या आयुष्याचा नायक आहेस. मी तुला कधीच विसरू शकत नाही. मिस यु डियर.”

हे सगळं व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं की रिया अजूनही सुशांत ला विसरली नाहीये. कारण प्रेम कधीही माणूस विसरू शकत नाही. मग ते पाहिलं असु किंवा दुसरं. तुमच्या माहितीसाठी की रिया चक्रवर्ती ने यापूर्वी सुशांतच्या स्मृतीत एक भावनिक पोस्ट लिहिली होती. खरंतर सुशांतच्या मृत्यूने तिला तीव्र धक्का बसला आहे. ती अजूनही धक्क्यातून सावरली नाहीये. सुशांतच्या जाण्याचं दु: ख तिला विसरता येत नाही. तीने सोशल मिडीयावरुन आपली व्यथा व्यक्त केली.

पण आताही सुशांतच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर रियाने भावनिक पोस्ट लिहिली. तिने सुशांतचे चित्र शेअर केले आणि लिहिले की, “मला माहित आहे की तु आता अधिक शांततापूर्ण ठिकाणी आहेस ” जिथं असशील तिथं खूश राहशील. तुला गमवून एक महिना झालेला आहे. पण हरकत नाही. आपल्याला प्रेम करायला सगळं आयुष्य आहे. आपल्या कामाने नेहमी स्मरणात राहणाऱ्या सुपरस्टार अभिनेता सुशांतसिंगला भावपूर्ण श्रद्धांजली….