या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने सुशांतच्या आ-त्म-ह-त्येविषयी केला मोठा खुलासा, म्हणाली “सलमान…

सुशांतसिंह राजपुत या अभिनेत्याला जाऊन एक महिन्याच्या वर झालेलं असतानाही त्याच्या बाबतीत होणारे खुलासे थांबायचं नाव घेत नाहीत. त्याच्या चाहत्यांना तर तो गेलाय यावर विश्वासच बसत नाही. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा होता. हे तो जगाला सोडुन गेल्यानंतर लक्षात यायला लागलं आहे. एवढंच नव्हे तर तो किती हरहुन्नरी मेहनती अभिनेता होता हेही त्याच्या अनेक व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मधुन सत्य बाहेर येत आहे. त्याच्या शेवटच्या चित्रपटात तोच आ-त्म-ह-त्या बद्दल सांगतो. मग त्यानं आ-त्म-ह-त्या करणं हे दुर्दैवी.

दरम्यानच्या काळात बॉलीवूड मधील अनेकांनी त्याच्या बद्दलच्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत. त्यामध्ये केदारनाथ चे दिग्दर्शक अभिषेक कपुर असं म्हणतात की सुशांत हा खुप मेहनती अभिनेता आहे. खुप हुशार आणि सकारात्मक आहे. एवढं मात्र खरं आहे की त्याला बॉलिवूड मधील काही लोकांचा त्रास होत आहे. म्हणजे त्याला त्या लोकांनी काम देण्याचं बंद केलं आहे. पण त्याने आ-त्म-ह-त्या केली यावर खरचं विश्वास बसत नाही. त्याच्याकडे आज स्वतःचा एवढा मोठा चाहता वर्ग होता की त्याने जगाला सोडुन जाण्याची गरजच नव्हती. पण जे घडलं यामागे लपलेलं सत्य पोलिसांनी बाहेर आणुन त्याला न्याय द्यावा हीच इच्छा.

अश्यातच सोशल मीडियावर भाई भतीजा वादविवादा वर सलमान खान पासुन करण जोहर पर्यंत अनेकांना ट्रोल केलं जात आहे. सुशांतसिंग च्या आ-त्म-ह-त्या ला यांना जवाबदार ठरवलं जात आहे. कारण असेही मानलं जात आहे की यशराज बॅनर ने त्याच्याकडून अनेक फिल्म साइन केल्या. पण त्या रणबीर सिंह ला दिल्या गेल्या.

यामुळे तो दुःखी होता. अशात करण जोहरच्या ड्राईव्ह मध्ये त्याला संधी मिळाली. पण काही महिन्यांपूर्वी लॉकडाउन मुळे त्याने फिल्म नेटफ्लिक्स वर विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे आणि करण जोहरचे वाद झाले असे सांगितलं जातं. व तेव्हापासून करण जोहरने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडुन टाकले त्यामुळे तो फारच दुःखी झाला.

वाढत चाललेलं नेपोटीझम वर अनेक अभिनेते अभिनेत्री बोलु लागले आहेत. त्यात कंगना रानवोत ह्या अभिनेत्रीने तर अनेक मोठे खुलासे केले आहेत. तिनं करण जोहर यांचे नाव घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अश्यात सगळ्या फॅन्स कडुन सीबीआय तपास व्हावा अशी मागणी जोर लावुन धरली जात आहे.

सुशांतसिंग च्या सगळ्यात जवळ अभिनेत्री पैकी एक होती ऋचा चड्डा. तिनं यावर एक ब्लॉग लिहुन आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यात तिनं बॉलिवूड मध्ये चालत असलेल्या भाई भतीजा वादविवादा वर सुद्धा टिप्पणी केली आहे. तिने ब्लॉग ची सुरुवात हिंदीतल्या प्रसिद्ध कवी साहिर लुधियानी यांच्या ओळीने केली आहे.

यहां इक खिलौना है
इन्सां की हस्ती
ये बस्ती है मुर्दा-परस्तों की बस्ती
यहां पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

या कवितेतुनच लक्षात येतं की बाहेरून दिसनारं ग्लॅमर वालं बॉलीवूड आतून किती भयानक आहे. ती त्या ब्लॉगच्या माध्यमातून पुढं लिहिते की इंडस्ट्री मधील भाई भतीजा वाद हा काही कालचा आजचा नाही. तो कायम चालत आलाय. आणि कायम चालत राहणार आहे. असं दिसत आहे. पण सुशांतसिंग गेल्यानंतर सुद्धा मला त्याची आठवण झोप येऊ देत नाही आहे.

तो खुप गुणी कलाकार होता. सध्याची इंडस्ट्री ही इनसायडर आणि आऊटसाईडर या दोन भागामध्ये विभागली गेली आहे. हे खुप दुर्दैवी लक्षण आहेत. अश्या घाण विचारणांवर चालणाऱ्या लोकांचे. पुढे ती म्हणते की काही असे लोक आहेत की ते फार दयाळू आहेत. पण काही खुप चुकीच्या प्रकारची वागणूक करतात. आता तरी त्यांनी स्वतःला समज घालवावी आणि जरा माणसासारखं वागावं. शेवट तिनं असं म्हंटलं की मित्रा जिथं कुठं असशील तिथं काळजी घे. अलविदा दोस्त!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.