Loading...

त्याचा ससे पाळण्याचा छंद त्याला बनवून गेला लखपती !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

हाताच्या बोटांची नखं वाढवणं, मिशा वाढवणं, किलो किलो सोन्याचे दागिने घालून मिरवणे, संपूर्ण शरीरावर गोंदवून घेणं, वगैरे. प्रत्येकाचा छंद वेगळा. आता ह्या वेगवेगळ्या छंदातून त्या मंडळींना काय फायदा होतो ह्याचा जर विचार केला ना तर डोकं काम करू शकत नाही अशी उत्तरं तुमच्या समोर येतील. कुणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी असले छंद जोपासतो तर कुणी मनाचे समाधान म्हणून छंद करतात, तर कुणी मित्र मैत्रिणींना खुश करण्या साठी छंद जोपासतात.

Loading...

माणूस म्हणलं की त्याला काही न काही छंद असतातच, असले छंद असलेले लोक काही वेळा एकदम प्रसिद्धीच्या झोतात येतात, कारण त्यांचा छंदच तसा असतो. काही लोकांना जुनी नाणी जमवण्याचा छंद असतो, तर कुणाला ऐतिहासिक वस्तू जतन करायचा छंद असतो. नाना प्रकारचे छंद जपणारी माणसं आज आपल्या देशात आहेत. काहींना काही गमतीदार छंद पण असतात बरं का.

हा असा एक तरुण की ज्याला लहानपणापासूनच ‘ससे’ घरी आणून त्यांना पाळण्याची आवड होती, स्वतः करायचा त्या सशांची देखभाल. त्यांना चारा देणं, त्यांच्यासाठी खाद्य तयार करून देणं, वेळेवर पाणी देणं हे सगळं तो आवडीनं करायचा. पण घरातल्या लोकांना त्याचा हा छंद आवडत नव्हता. म्हणून घरातून आणखी ससे विकत आणायला त्याला पैसे मिळत नव्हते.

पण हा हट्टी मुलगा इकडून, तिकडून पैशांची जमवाजमव करायचा आणि आणखी ससे विकत घेऊन यायचा. छंद म्हटलं की काहीही करून तो आपण जोपासतोच ना? ह्याने सुद्धा तेच केलं. आपल्या आवडीचा छंद जोपासला. घरातून त्याला विरोध होताच पण तरी सुद्धा त्याने हे ससे अगदी प्रेमाने पळाले.

ह्या छंदाचा फायदा त्या मुलाला असा झाला की अशीच ससे पाळण्याची आवड असणारे लोक त्याच्याकडे येऊन ससे विकत देण्याची मागणी करायला लागले. हो, नाही करत त्याने एखादा ससा विकत देण्याची तयारी दाखवली, आणि त्याच पैशातून आणखी ससे विकत आणले. त्याच्याकडे आणखी लोक यायला लागले, मागणी वाढली.

आणि ह्यातून त्याला हे ससे पाळणे म्हणजे एक व्यवसाय होऊ शकतो ह्याची जाणीव झाली. काही दिवसानंतर लोकांच्या मदतीने त्याने हा व्यवसाय म्हणून कसा करता येईल ह्याची माहिती मिळवली. ट्रेनिंग घेतलं आणि ससे पाळण्याचा हा छंद व्यवसाय म्हणून सुरू केला. पैसे मिळतात म्हटल्यावर घरच्या लोकांनी त्याला थोडीफार पैशांची मदत केली. आणि ह्या व्यवसायाला सुरुवात केली.

Loading...

हरियाणातल्या ‘जिंद’ ह्या गावातला हा तरुण , ह्याचं नाव आहे ‘संजयकुमार देशभर’. ह्या ससे पालन व्यवसायातून इतक्या तरुण वयात वर्षाकाठी १०/१२ लाख रुपयांची कमाई करतोय. त्याने ह्या व्यवसायासाठी त्याच्या शहरा जवळच्या रोहतक बायपास रोडवर एक मोठं शेड उभं करून सुरुवातीला १०० ससे आणून सुरुवात केली. आता व्यवसाय वाढत चालला आहे.

हा तरुण आता हरियाणातल्या अनंत पाळीव प्राणी विकणाऱ्या दुकानांना ससे पुरवायला लागला आहे. अशी अनेक ‘पेट स्टोअर्स’ त्याला मिळाली आहेत आणि व्यवसायात खूपच वाढ झाली आहे. ससे पालन फार खर्चिक नाही आणि जास्त पैसा लागत नाही असं हा तरुण इतरांना मार्गदर्शन करताना सांगतो. त्यामुळे कोणालाही हा व्यवसाय सुरू करता येईल असं तो म्हणतो.

फक्त सशांची योग्य देखभाल करायची म्हणजे ह्या सशांना मूठभर खाद्य, मूठभर चारा, आणि तीनचार वाट्या पाणी एवढंच देणं , त्यासाठी फार कष्ट नाहीत, फक्त सुरुवातीला मोठं शेड आणि ससे विकत घेण्यासाठी लागतात तेवढीच पैशांची आवश्यकता आहे , नंतर फार पैसा लागत नाही. खाद्य व्यवस्थित दिलं की ह्या पिल्लांची वाढ चार महिन्यात चांगली होते आणि प्रत्येकी ३५० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री होते.

त्यामुळे ह्यातून मिळणारा फायदा सुद्धा चांगला आहे. आणि ह्या सशांना देशभरातून चांगली मागणी आहे. कोणालाही कधीही सुरू करता येईल असा हा व्यवसाय हा छंदातून निर्माण झाला आहे. कुक्कुट पालन, शेळी पालन, ह्या व्यवसायासारखाच ससे पालन हा व्यवसाय आहे. त्यासाठी सुद्धा सरकारी मदत मिळू शकते. त्यामुळे कोणाला व्यवसायात उतरायचं असल्यास हा सुद्धा चांगला व्यवसाय म्हणून निवड करता येईल.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.