Loading...

कोण आहे रिंकूच्या मनात?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांचा मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. हे खास चित्रपट आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपटमध्ये ‘सैराट.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल तीन वर्षे उलटली असली तरी चित्रपटातील गाणी तसेच डायलॉग आजही अनेकांच्या तोंडून सरास ऐकायला मिळतात.

Loading...

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगूरु आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होते. या दोघांनीही या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. रिंकूने चित्रपटात आर्चीची भूमिका साकारली होती तर आकाशने परश्याची.

त्या दोघांची प्रेम कहाणी पाहणे आजही चाहत्यांना प्रचंड आवडते. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता.

आता हिच परश्याची अर्ची खऱ्याखुऱ्या आयुष्यात कोणाला डेट करते? कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत असतात. नुकताच रिंकूने इन्स्टाग्रामच्या ‘Ask Me Anything’ च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान चाहत्यांनी तिला तिच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल विचारले होते. एका चाहत्याने रिंकूला ‘तू सिंगल आहे का?’ असा प्रश्न विचारला.

Loading...

त्यावर रिंकूने ‘हो’ असे उत्तर दिले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने तिला ‘तुझा बॉयफ्रेंड आहे का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर रिंकूने ‘नाही माझा बॉयफ्रेंड नाही’ असे उत्तर दिले आहे. रिंकूचे हे उत्तर ऐकून चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे.

रिंकूच्या ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने ‘सैराट’चा हिंदी रिमेक आणला होता. या चित्रपटाचे नाव ‘धडक’ ठेवण्यात आले होते.

या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर मुख्य भूमिकेत होते. या दोन्ही स्टारकिड्सने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.