Loading...

RO च्या नावाखाली आपण फसवले जात आहोत ? काय आहे सत्य जाणून घ्या.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

पिण्याच्या पाण्यासाठी आपण RO चा मोठय़ा प्रमाणावर वापर करतो आहोत, पण आपण स्वतः कधीच पडताळून पाहीलंय की खरच ह्या RO पासून आपल्याला काही धोका तर नाही ना?….

कधीच नाही. कारण मित्राने घेतला म्हणून तो आपण घेतला, नात्यात कोणीतरी घेतला म्हणून तो आपण घेतलेला असतो.

ह्या पूर्वी आपले आई वडील कधी वापरत नव्हते, पण आता मिळकत वाढली, तर नवीन सुविधा पण वढल्या , मग आपलंच उत्पादन सतत जास्त प्रमाणात विकलं जावं म्हणून जाहिराती सुद्धा वाढल्या. आपण जाहिरातीचे बळी . घेतला एकदाचा तो RO. किती शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळायला लागलं हा आनंद आपल्याला होतो आहे. आता कसली काळजीच नाही,म्हणत आपण निश्चितच निश्चिंत झालो आहोत.

Loading...

पाणी हे जीवन आहे हे आपण सगळेच जाणतो. पाणी शरिराला आवश्यक आहे. शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिणे जरूरीचे आहे. आता ते आपल्या च काही चुका मुळे अशुद्ध होते आहे. त्यात अनेक विषारी पदार्थ मिसळले जातात, म्हणून ते शुद्ध करणारे RO बाजारात आले. हे RO पाणी शुद्ध करतात असा RO तयार करणारी कंपनी दावा करते. म्हणून आपण ते खरेदी करून निश्चिंत होतो, पण पणी शुद्ध करताना पाण्यात असलेली खनिज द्रव्य नष्ट होतात .

 

म्हणजे पाण्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, हेच नष्ट होतात आणि आपल्या शरीराला जे पाहिजे तेच जर मिळाले नाही तर हळू हळू त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतात, आणि वेगळ्याच आजारांना आमंत्रण दिलं जातं, म्हणजे हाडं ठिसूळ व्हायला लागतात, शरीरात खूप थकवा जाणवायला लागतो, कोणतेही काम करण्याचा उत्साह राहत नाही, हृदय रोगाकडे वाटचाल सुरू होते.असले नको ते आजार जवळ येतात.

हे सगळं हाडांचे निष्णात डॉक्टर आणि वैज्ञानिक सिद्ध करून सांगतात. शरीराला पाण्यातून मिळणारे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे RO च्या पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत ९२ ते ९९ टक्के नष्ट होतात. मग शरीराला काय मिळणार? म्हणजे माणसाचे आयुष्य कमी होणार हे निश्चित.

अशियातल्या अनेक राष्ट्रांनी आणि युरोप मधल्या काही देशांनी ह्या RO वर बंदी घातली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने सगळ्या राष्ट्रांना ह्या गोष्टीची अधिकृत माहिती दिली आहे, तरी पण अनेक राष्ट्रात RO वापरला जातो आहे. आपल्या ही देशाला फार पूर्वी ही माहिती WHO ने दिली होती. पण ह्या कंपन्यांवर अजूनही आपल्याकडे बंदी घातली गेली नाही.

ह्याचे कारण पूर्वीपासून चालू असलेला भ्रष्टाचार कारणीभूत असेल कदाचित. ह्या RO निर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांचे हात जागतिक स्तरावर पोचलेले आहेत त्यामुळे ही विक्री अनेक राष्ट्रांमध्ये अजूनही चालू आहे.

ह्याच RO प्रमाणे प्लास्टिक च्या बाटल्यांमध्ये भरून विकले जाणारे पाणी सुद्धा आपल्या शरीराला किती घटक आहे हे ही विज्ञानाने सिद्ध करून दाखवले आहे. प्लास्टिक च्या बाटल्या तयार करताना त्या नरम राहाव्यात म्हणून ह्या प्लास्टिक बरोबर पॅथलेट्स रसायन मिसळले जाते हे रसायन साधारण तापमानाच्या थोडे वर असलेल्या तापमानात बाटलितल्या पाण्यामधे विरघळून जाते आणि ते पाण्याबरोबर सरळ आपल्या शरीरात जाते.

Loading...

नेहमी हे पाणी पाण्यामुळे आपल्या शरीरावर ह्या रसायनाचा परिणाम दिसायला लागतो, म्हणजेच प्रजनन

क्षमता कमी होत जाते. असले हे विलक्षण परिणाम जर आपल्या शरीरावर होत असतील तर असे पाणी पिणे हे किती घटक आहे ह्याचा विचार आपण सर्व सामान्य लोकांनी निश्चितच केला पाहिजे , हे सगळे संशोधन अमेरिकेच्या नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल ने करून त्याचे अहवाल सादर केले आहेत.

भारतातल्या सुद्धा सगळ्यात महत्वाचे मानले गेलेले भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर ने सुद्धा हे पडताळून पाहिले आहे की बंद बाटल्यातले पाणी सतत पाण्यामुळे शरीरावर किती घातक परिणाम होऊ शकतात ते. त्यांनी त्याचा रिपोर्ट सुद्धा प्रसिद्ध केला आहे.

मग आता पाणी प्यायचं कोणतं? हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. क्लोरीनेशन करून जंतुविरहित केलेलं पाणी हे पिण्यासाठी शुद्ध पाणी म्हणून वापरणे अधिक फायदेशीर ठरते .

क्लोरीन मुले जंतू पूर्ण मरतात, आणि खनिज द्रव्य तशीच राहतात , म्हणून हे पाणी पिणे योग्य ठरते. दुसरे आणि अतिशय शुद्ध पाणी आपल्याला जुन्याच पारंपरिक पद्धतीने मिळते ते म्हणजे पाण्याच्या नळाला चौपदरी कापड बांधून पाणी भरून घेऊन ते पाणी उकळून घेऊन नंतर थंड करून पिणे म्हणजे सगळ्यात शुद्ध पाणी आपल्याला मिळेल.

हे सगळं आपल्यालाच ठरवायचं आहे . कोणतं पाणी प्यायचं ते . पण जुनीच पद्धत जास्त योग्य आणि बिन धोक अशी पद्धत आहे. सगळ्यांनी जरूर विचार करावा आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून योग्य पद्धत वापरावी….

 

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.