Loading...

भीक मागणाऱ्या या आज्जीनी शाहिद जवानांच्या कुटुंबाला दिले 6.50 लाख रुपये !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामुळे संपूर्ण देश खालावला आहे. सगळ्यांच्या मनाला हळहळ लागली आहे. आपआपल्या परी प्रत्येक जन हल्ल्यात वीरगतीला प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबाला मदत करत आहेत. कुणी फेसबुकवरून ६ कोटी जमविले तर कुणी आपल्या वेबसाईटवरून ५ कोटींची मदत केली. अनेक सिनेतारकांनी, खेळाडूंनी आणि व्यावसायिकांनी सुद्धा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

एवढं सगळं होत असताना एक अति आश्चर्यजनक बातमी समोर आली आहे.  राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या महिलेने तब्बल सहा लाख रुपये जवानांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय केला आहे. या महिलेलेचे नाव देवकी शर्मा आहे. देवकी अजमेरच्या एका मंदिराबाहेर भिक्षा मागायची.

तिने आयुष्यभर भीक मागून गोळा केलेली रक्कम शहिदांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवी शर्मा आता या जगात नाही; सहा महिन्यापूर्वीच तिचे निधन झाले. तिची शेवटची इच्छा होती कि तिने आयुष्यभर कमावलेली रक्कम हि वेळप्रसंगी सैनिकांच्या मदतीसाठी द्यावी.

अजमेर, राजस्थान मधील बजरंग गडच्या माता मंदिरात देवकी भिक मागून आपले दिवस काढत होती. सहा महिन्यापूर्वी ती वारली पण तिने तिथे जवळपास ७ वर्षे बीम मागून आपली रोजी-रोटी चालविली. मृत्यूपूर्वी या महिलेने भीक मागून तब्बल 6 लाख 61 हजार 600 रुपये जमा केले होते. हे पैसे बजरंगगढ इथल्याच बँक ऑफ बडोदामधील अकाऊंटमध्ये जमा केले होते.

जेव्हा देवकीला कळले कि आता आपला शेवट जवळ येत आहे तेव्हा तिने मंदिरातल्या विश्वस्तांना सांगितले कि तिची हि रक्कम एका चांगल्या कार्यासाठी वापरावी; जन सहकार्यासाठी वापरली जावी. म्हणून मंदिराचे विश्वस्त संदीप यांनी देवकी शर्मा यांच्या शेवटच्या इच्छेनुसार हि रक्कम जवानांच्या परिवाराला देण्याचा निर्णय केला आहे.

Loading...

अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांच्याकडे बँक ड्राफ्टद्वारे हि रक्कम सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हि रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केली.  बजरंग गडच्या माता मंदिरात भिक मागणाऱ्या देवकीच्या शेवटच्या इच्चेनुसार ही रक्कम आता जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

राजस्थानातील जे सीआरपीएफ जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना हा पैसा मिळेल अशी बातमी आहे. देवकी भिक मागून मिलाल्लेई रक्कम आपल्या घरातच ठेवत होती. जेव्हा ती मेली तेव्हा तिच्या अन्थारुनाखाली तब्बल दीड लाख रुपये मिळाले. हा पैसाही मंदिर समितीने बँकेत जमा केला होता. देवकी यांच्या इच्छेनुसार त्यांचा पैसा चांगल्या कार्यासाठी वापरण्यात यावा.

त्यानुसार तो पैसा देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. तुम्हालाही जर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला मदत करायची असेल तर पेटीएम किंवा अधिकृत संकेत स्थळावर जाऊन त्यांना मदत करावी हीच विनंती.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.