Loading...

काय आहे पुष्करची स्ट्रटेजी ? सई असेल दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री…

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगत आहे अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य… या टास्कसाठी घरामध्ये काही गेस्ट देखील आले आहेत. हे गेस्ट म्हणजे पहिल्या पर्वातील सदस्य पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता. आता हे गेस्ट घरातील सदस्यांन वेगवेगळे टास्क देत आहेत. हे सदस्य दिलेले टास्क चतुराईने कसे पूर्ण करतील आणि स्टार मिळवतील हे आज कळेलच… घरामध्ये आलेले गेस्ट हे पहिल्या पर्वातील अतिशय हुशार सदस्य आहेत.  प्रत्येक टास्क कुशलतेने आणि बुद्धीचा वापर करून जिंकले… हेच सदस्य काही स्ट्रटेजी आज टास्क दरम्यान वापरणार आहेत…

आज पुष्कर साखर, चहा पावडर आणि मिठाची बरणी लपवताना दिसणार आहे… आता अचानक या बरण्या कुठे गेल्या असा प्रश्न सदस्यांना पडण अगदीच सहाजिक आहे… घरातील सदस्य एकमेकांच्या टीमना दोषी ठरवून तुम्हीच या बरण्या लपवल्या असं देखील म्हणू शकतील ? बघुया पुढे काय होत ? बरण्या यांना मिळणार का ? सदस्य बरण्या कशा मिळवणार ?

आजच्या भागामध्ये अजून एक गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे, सई बिग बॉस मराठी सिझन २ च्या दुसऱ्या वाइल्ड कार्ड स्पर्धक आहेत असे बिग बॉस जाहीर करणार आहेत… हे ऐकून घरातील सदस्य आणि सई खूप खुश आहेत… सईने बिग बॉसचे आभार देखील मानले… आजच्या भागामध्ये बघुया पुढे काय घडत… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Loading...

Loading...

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.