सलमान खान सोबत काम करण्यासाठी या अभिनेत्रीला मिळालं चारपट अधिक मानधन !

भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत सलमान खानचेही नाव सामील आहे. तसेच आतापर्यंत अभिनेते त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेततात अगदी असाच निर्णय अभिनेत्री पूजा हेगडेनेही घेतल्याचे दिसतंय. पूजा हेगडेचे फिल्मी करिअर पाहता ती सध्या यशोशिखरावर आहे. ‘हाऊसफुल 4’ आणि अल्लू अर्जुनसोबत ‘अला बैकुंठपुरामुलु’च्या माध्यमातून सलग दोन हिट सिनेमा तिने दिले आहेत.

आता तिला सलमान खानसोबत एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.पूजा लवकरच सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दीवाली’मध्ये झळकणार आहे. या सिनेमात काम करण्यासाठी पूजानेही मानधन वाढवले होते. तसेच तिची लोकप्रियता पाहता निर्मात्यानेही तिला चारपटीने मानधन देत सिनेमासाठी साईन केले आहे. त्यामुळे नक्कीच आज मै उपर आसमाँ निचे अशीच काहीशी अवस्था तिची झाली आहे.

सलमान आणि पूजा यांची जोडी पहिल्यांदाच समोर येत आहे आणि याचा ट्रैकदेखील ह्यूमरने पुरेपूर आहे, निर्मात्यांनी अक्टूबरमध्ये पहिल्या शूट शेड्यूलसाठी अनेक वर्कशॉपची योजना बनवाली आहे ज्यामुळे या जोड़ीला एकमेकांसोबत कम्फर्टेबल होण्यास मदत मिळेल.सलमान खान या चित्रपटात एकदम नव्या अवतारात दिसणार आहेत आणि त्याच्या लूकची चर्चा सुरू आहे. त्याची प्रेमिका एका छोट्या शहरातील पारंपारिक मुलगी असून सलमानहून खूप वेगळी आहे.