तब्बल इतक्या कोटींचा मालक आहे बॉलीवूडचा दबंग खान, या बाईकची किंमत ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खान अद्यापही अभिनयाच्या बाबतीत नव्या अभिनेत्यावर भारी पडताना दिसतो. त्यामुळे त्याच्या रिअल लाईफ विषयी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सलमानच्या नवाबी रुबाबाप्रमाणेच त्याची आवडही तशीच हटके आहे. सलमानच्या संपत्तीविषयी बोलायचं झाल्यास सलमान खान फक्त रील लाईफमध्ये नाही तर रिअल लाईफमध्येही ‘सुलतान’ आहे.

मुंबईच्या बीचवर सलमानच्या फॅमिलीला प्रायव्हसी मिळत नसल्यानं त्यानं त्याच्या 51व्या बर्थ डेला एक 5BHK बीच साईड घर विकतं घेतलं आहे. जवळपास 100 एकरमध्ये पसरलेल्या या घरात जिम, स्विमिंग पूल, प्ले एरिया थिएटर आणि बऱ्याच सोईसुविधांचा समावेश आहे. या घरातची किंमत जवळपास 100 कोटी रुपये एवढी असल्याचं बोललं जातं.

सलमानचं पनवेल फार्म हाऊस तर सर्वाच्या परिचित आहे. त्याच्या अनेक पार्ट्या याच ठिकाणी होत असतात. 150 एकरच्या या फार्म हाऊसची किंमत 80 कोटी रुपये आहे. हे फार्म हाऊसही सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण आहे.

सलमान आणि त्याची फॅमिली गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये राहत असली तरी नुकतीच सलमाननं एका 11 मजली इमारतीत गुंतवणूक केली आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की लवकरच खान फॅमिली या ठिकाणी शिफ्ट होईल.

याशिवाय सलमानकडे स्वतःची प्रायव्हेट यॉट आहे. ज्याची किंतम जवळपास 3 कोटी रुपये आहे.

कारची विशेष आवड असलेल्या सलमानच्या ताफ्यात सध्या Mercedes Benz GL Class (जवळपास 80 लाख), Mercedes Benz S Class (जवळपास 82 लाख), Audi A8 L (जवळपास 1.13 कोटी), BMW X6 (जवळपास 1.15 कोटी) Toyota Land Cruiser (जवळपास 1.29 कोटी), Audi RS7 (जवळपास 1.4 कोटी) Range Rover (जवळपास 2.06 कोटी), Audi R8 (जवळपास 2.31 कोटी) a Lexus LX470 (जवळपास 2.32 कोटी) या कार्सचा समावेश आहे.

महागड्या कार व्यतिरिक्त सलमानकडे 16 लाख रुपयांची हायाबूसा बाइक आहे. य शिवाय यमाहा R1 (15लाख), सुझुकी GSX-R1000Z(16 लाख) आणि सुझुकी इंट्रूयूडर M1800RZ (16लाख) या बाइकचं कलेक्शनही त्याच्याकडे आहे.

सलमान खान अनेकदा सायकल चालवताना दिसणाऱ्या सलमानकडे 4 लाख रुपयांची GiantPropel2014XTC ही सायकलही आहे.

सलमानचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड असलेल्या बीइंग ह्यूमनची वार्षिक कमाई 235 कोटी रुपये एवढी आहे.

याशिवाय सलमानचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. ज्यानं आता पर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.