Loading...

९ वर्षांपूर्वी लावलेली चंदनाची रोपटी आता मिळवून देतील ३० कोटी रुपये !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

चंदनाची शेती ही अतिशय दुर्मिळ प्रकारात मोडते. चंदन म्हंटल्यावर आपल्याला आठवते ते चंदनाचे खांडके, दिवाळीतला चंदन साबण आणि वारकऱ्यांच्या भाळावरचा चंदनी टिळा.. पण चिंतेची बाब म्हणजे ह्या मौल्यवान चंदनाची होणारी तस्करी.. कारणच तसे आहे. चंदनाची मागणी आहे ३०० टक्के आणि उत्पादन आहे अवघे ३० टक्के.. दक्षिण भारतात होणारे चंदनाचे उत्पादन देखील ह्या ३० टक्क्यांमध्ये गृहीत आहे. त्यानंतर गुजरात राज्यामध्ये देखील चंदनाचे उत्पादन सुरू झाले आहे आणि आता तेथील शेतकऱ्यांना घसघशीत नफा देखील करून देणार आहे ही चंदनाची शेती.

 

तर हा किस्सा सुरू झालाय साधारण २०१० – २०११ पासून. गुजरातेतल्या भरुच जिल्ह्यातील हांसोट तालुक्या मधील कांटासायण गावात राहत असलेल्या अलकेश भाई पटेलनी चंदन शेतीचे पहिले रोपटे लावले.. त्यावेळचे स्थानिक मंत्री ईश्वरसिंह पटेल ह्यांनी त्यांच्या अखत्यारीत, वन विभागातून पांढऱ्या चंदनाची रोपटी मागवून अलकेश भाईंना मिळवून दिली. तेव्हा पासून ह्या चंदनाच्या शेतीला गुजरातेत सुरुवात झाली. ९ वर्षांनंतर आज ही रोपटी मोठ्या वृक्षात बदलली आहेत आणि येणाऱ्या ५ एक वर्षात ही गजांतलक्ष्मी अलकेश भाईंना ३० करोडची कमाई करून देणार आहे.

Loading...

खरे तर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांना ह्या राज्यात चंदनाच्या शेतीस सुरुवात करायची होती. त्यांनी त्यावर कामही सुरू केले होते. शेतकऱ्यांसाठी काढलेल्या अध्यादेशात असे नमूद केले होते की, सगळे शेतकरी सरकार कडून चंदनाची रोपं घेऊन आपापल्या शेतात त्यांची शेती करू शकतात. मात्र प्रत्येकवेळी चंदन विक्री करताना सरकारला २० रुपयांची रॉयल्टी द्यावी लागेल. ही रॉयल्टीची रक्कम अगदीच नगण्य असल्याने आणि सरकारकडून उत्तम प्रोत्साहन मिळाल्याने अलकेश भाईंसारख्या छोट्या शेतकऱ्याने देखील अल्पावधीत खूप मोठा पल्ला गाठला आहे.

पण ही शेती सोप्पी नव्हती हो.. वाळवंटी गुजरातची माती चंदनाच्या झाडांसाठी योग्य नाही. त्यात भरपूर प्रमाणात क्षार आढळून येतात. पण गुजरात सरकारने ‘पण’ केला की, चंदनाची लागवड गुजरातेत करायचीच आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवायचे. मग सरकारने नवसारी कृषी विद्यालयातून विद्वान शिक्षक अभ्यासक बोलावून शेतकऱ्यांना क्षारयुक्त जमिनीतही चंदनाची लागवड कशी होऊ शकते ह्याचे शिक्षण दिले. अलकेश भाईंनी ह्या मदतीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

Loading...

खडकाळ आणि क्षारयुक्त जमिनीत आणि तेही अल्पशा पाणीपुरावठ्यात ९ वर्षांपूर्वी चंदनाची लागवड केली. आणि आज त्यांच्या प्रयत्नांना १०० टक्के यश मिळाले आहे. ही चांदनावही झाडे १५ ते २० फूट उंच झाली आहेत. हे एक झाड ३ लाखांपर्यंत उत्पन्न देऊ शकते आणि अलकेश भाईंकडे हजार चंदनवृक्ष आहेत. म्हणजे कमाई होईल करोडोंचा घरात. अर्थात त्यांना त्यांचा तस्करी पासून डोळ्यात तेल घालून बचाव करावा लागणार.

ह्या पद्धतीच्या शेती मध्ये भरपूर पैसा असला तरी त्याला मात्र काही वर्षांचा अवधी लागतो. पण मिळणारा फायदा तुम्हाला करोडपती करून जातो हे नक्की.. अलकेश भाईंमुळे त्यांच्या आजूबाजूच्या शेतकरी मित्रांनी सुद्धा चंदनशेतीस सुरुवात केली. जवळपास ५ हजार चंदन शेती करणाऱ्या गुजराती शेतकऱ्यांच्या चमूनी कर्नाटका सरकार बरोबर विक्रीची डील देखील केली आहे. म्हणजे उत्पन्न यायच्या आधीच त्याला बाजारपेठही मिळाली आहे. आता हे सगळेच शेतकरी गब्बर होणार हे निश्चित.

एक वृक्ष माणसाला काय काय देऊन जातो. आणि आपण मात्र निसर्गाला हानी पोहचवतो. अलकेश भाईकडून हे उदाहरण घेण्यासारखे आहे. चंदनाच्या प्रतीक्षेत त्यांनी हंगामी शेती करून देखील आपले आणि कुटुंबाचे पंपालन पोषण योग्यरीत्या केले आहे. आता काही वर्षांत हा चंदन त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीरूपी सुगंध देखील पसरवणार आहेच.. मात्र आशा कल्पना इतरही राज्यात राबवल्या जाव्यात. म्हणजे बळीराजा सुखी होईल. आणि बळीराजा सुखी तर देश सुखी..!! नाही का..??!!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.